logo

HOME   महाराष्ट्र

जाती पातीचे राजकारण करित नाही - खासदार धानोरकर

जाती पातीचे राजकारण करित नाही - खासदार धानोरकर

 वरोरा :- सर्व धर्मातील व्यक्तींना घेऊन चंद्रपूर - वणी -आर्णी लोकसभा मतदार संघात विकास करावयाचा आहे .मी जाती पातीचे राजकारण करित नाही असे प्रतिपादन खासदार बाळु धानोरकर यांनी गरीब नवाज कोन्फेन्स  माजरीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात केले .यावेळी खासदार बाळु धानोरकर वरोरा विधानसभा निवडणुक इंदिरा कॉंग्रेड पक्षाचे निरीक्षक तथा राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष जगदीश माली ,हसन रजा ,राजा खान , सोहेल भाई , फारूख अहमद , ताजुद्दीन उर्फ फिरोज , गुलाम रसुल, एजाज अहमद , वसीम अहमद ,मेहमुद खान , अनिस तुल्ला, मनसुर खान , अनिस खान , जावेद आलम , जाकीर खान आदी उपस्थित होते .मी राजकारणात आल्यापासून जाती पातीचे राजकारण केले नाही, मी सर्व समाजाला घेऊन नेहमी चालत आलो .भद्रावतीमध्ये मुस्लिम समाजाला कब्रस्थानाला जागा मिळत नव्हती .कब्रस्थानाला जागा स्वतः घेऊन दिली. अशी अनेक कामे शिवसेनेमध्ये असतांना केली .त्या पूर्वीपासूनच मुस्लिम समाज माझ्या पाठीशी आहे व आजही आहे असेही खासदार धानोरकर यांनी आपले मत व्यक्त केले .या प्रसंगी जगदीश माली यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.Top