मूल :- सामाजिक कार्यकर्त्यां शितल वाडगुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आपल्या महिला सहकार्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विकासात्मक दृष्टीकोनाला पाठिबा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार आणी महिला तालुका अध्यक्ष संगीता गेडाम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश घेतला.
अत्यंत तळागाळातील महिलांच्या प्रश्नांची जाण असलेल्या कार्यकर्त्यां म्हणुन शीतल यांची ओळख असुन येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुल शहर अध्यक्ष आकाश येसनकर, ओबीसी आघाडीचे तालुका अध्यक्ष वासुदेव पिपरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रोहित कामडे, तालुका सचिव प्रशांत मेश्राम, तालुका उपाध्यक्ष महेंद्र कोडापे,महिला मुल शहर अध्यक्ष धाराताई मेश्राम, मुल शहराचे अल्पसंख्यांक अध्यक्ष आशु खान, रज्जत कुकडे, माया शेंडे, सुवर्णा रामटेके, रोहित शेंडे, सुरज गिरडकर यांची उपस्थिती होती.