Education तिसऱ्या माळ्यावरून उडी घेत विद्यार्थीनीने संपवली जीवनयात्रा ..! by Ashish Ghume August 1, 2024
Podcast दाबगाव ग्रामपंचायत सरपंचपदी निर्मला किरमे तर उपसरपंचपदी योगिता नीलेश गेडाम विराजमान December 29, 2023
Podcast वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे धान खरेदी नोंदणीची मुदत वाढविली December 29, 2023
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता November 21, 2024
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला. गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले. पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले. *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव November 20, 2024