भामरागड :- आज पहाटे सर्वप्रथम भामरागड तालुक्यातील कोसफुंडी या गावात हत्तीचे दर्शन झाले त्यानंतर कारमपल्ली – टेकला या जंगल परिसरात हत्तीचे दर्शन झाले मात्र या ठिकाणी काही अनुचित घटना घडल्या नाही.त्यानंतर कियर येथील शेतशिवारात दुपारी 4.00 ते 4.30 च्या दरम्यान याच गावातील गोंगलू तेलामी वय 45 यांना हत्तीने ठार मारले त्यानंतर सदर हत्ती त्याभागातून पसार होऊन आरेवाडा परिसरातील हिदूर या गावात घुसून सायंकाळी 7.30 च्या सुमारास महारी देवू वड्डे वय 50, राजे कोप्पा आलामी वय 50 व वंजे जुरू पुंगाटी यांना गंभीर जखमी केले.त्यानंतर या तीनही महिलांना ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे उपचाराकरिता आणण्यात आले मात्र दुखापत मोठ्या व गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे.
एका महिलीचे दोन्ही पाय व पोटावर हत्तीने पाय मारल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे तर बाकीच्यांनाही कायम अपंगत्व येण्याचे प्राथमिक अंदाज येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढले आहे. या संपूर्ण प्रकरणात वन विभाग मात्र पाहिजे तेवढा सक्रियेतेने या विषयाला घेतले नाही. त्यामुळे नागरिकांत वनविभागाबद्दल तीव्र नाराजी आहे.
मुख जनावर म्हणून कड़ाही करेल का?, वनविभाग झोपला आहे का ?, जर का आसच कृत्या मनवानी केला असत तर वनविभाग लगेच त्यावर कारवाई केला असत