वरोरा : तालुक्यातील वायगाव भोयर येथे शेतात वीज पडून चार महिला ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज (30 जुलै) दुपारच्या सुमारास घडली .
वरोरा पंचायत समितीचे माजी सदस्य शालिक झाडे यांचे शेतात आज त्यांच्या पत्नी माजी पंचायत समिती सदस्या हिरावती शालिक झाडे (४५),पार्वताबाई रमेश झाडे (५५) , मधुमती सुरेश झाडे (२0),रीना नामदेव गजभे (२२) शेतात काम करीत असतांना अचानक पावसाला सुरवात झाली.पावसापासून वाचण्याकरिता त्यांनी शेतातील पळसाच्या झाडाचा आधार घेतला.पण त्याच झाडावर वीज पडल्याने यात त्या चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला . सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. घटनेची माहिती पोलिसांना कळताच शेगाव पोलीस घटनास्थळी पोहचले..सदर घटनेचा पंचनामा पोलीस करीत आहे .