बाखर्डी :- हनुमान मंदिराच्या मदतीकरिता सतत दुसऱ्या वर्षी बाखर्डी येथे विशाल शंकर राजूरकर यांच्या शेतात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या बैल गाडा शर्यतीचे उद्घाटन बाखर्डी येथील सरपंच अरुण रागीट यांच्या हस्ते पार पडले
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संजय गांधी निराधार समिती माजी अध्यक्ष उमेश राजूरकर प्रमुख पाहुणे म्हणून सत्कारमूर्ती डॉ गिरीधर काळे कैलास कोरांगे अशोक झाडे प्रतीक सदनपवार विठ्ठल गोहोकार प्रकाश खुसपुरे शंकर राजुरकर विठ्ठल पानघाटे किशोर विधाते खुशाब हिरादेवें कालिदास वानखेडे आदी उपस्थित होते
सरपंच अरुण रागीट म्हणाले की शेतकऱ्यांचा आनंदाचा खेळ म्हणजे बैल गाडा शर्यत होय आपल्या भागात मोठ्या बाजारपेठ असल्याने मागील वर्षापासून बैल गाडा शर्यतीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे सध्या शेतकऱ्यांची शेतातील कामे अंतिम टप्प्यात आल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बैल गाडा शर्यतीत सहभाग घ्यावा असे आवाहन केले
कार्यक्रमाचे संचालन विनोद कडुकर तर आभार श्रीकांत राजूरकर यांनी मानले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज हिरादेवें दिवाकर सावे भारत पाल अमोल हिरादेवें शरद भोयर मंगेश काकडे प्रमोद गाणंफाडे विलास जेणेकर गणेश उलमाले अशोक काकडे जनार्धन जेणेकर विनोद टेकाम यांनी परिश्रम घेतले