ब्रम्हपुरी/सन २०२१-२२ अंतर्गत कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करीता सहाय्य,(आत्मा) योजना अंतर्गत तालुका शेतकरी सल्लागार समितीची बैठक ४ फेब्रुवारी रोजी तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ब्रम्हपुरी पंचायत समीतीच्या सभागृहात पार पडली.
यावेळी सदर सभेत ब्रम्हपुरी तालुका शेतकरी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी खेमराज तिडके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
सदर सभेला आत्मा प्रकल्प उपसंचालक मनोहरे, जि.प. सदस्य डॉ.राजेश कांबळे, जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, जि.प.सदस्या .स्मिताताई पारधी, राज्यस्तरीय शेतकरी सल्लागार समितीच्या सदस्या . मालतीताई कुथे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सेलोकर, महिला काॅंग्रेस कमेटी अध्यक्षा मंगलाताई लोनबले, माजी जि.प. सदस्या भावनाताई ईरपाते, तालुका कृषी अधिकारी खंडाळे, मंडळ कृषी अधिकारी मंद्रे, तंत्रज्ञ व्यवस्थापक आत्मा हातझाडे यांसह शेतकरी सल्लागार समितीच्या सर्व सदस्यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
या सभेत कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी माहीती देण्यात आली.
सदर शेतकरी सल्लागार समीती ही कृषी विभागाला व तालुका तंत्रज्ञान चमु समीतीला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी व तालुक्यातील पीक परीस्थितीबाबत अवगत करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी मदत करते.