वरोरा:- तालुक्यातील वाठोडा या गावातील प्रशांत विठ्ठलं सायंकार यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत एका आनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला.
प्रशांत विठ्ठलरावं सायंकार हे नेहमी प्रमाणे आपल्या शेतात सकाळी गेले असता सकाळी ६ च्या सुमारास एका अनोळखी इसमाचा मृतदेह त्यांच्या विहिरीत तरंगताना त्यांना दिसला त्यांनी लगेच शेगावं पोलीस स्टेशन ला माहिती दिली. माहित दिल्या बरोबर शेगावं पोलीस स्टेशन चे ठाणेदार हे घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह बाहेर काढला. हा इसम अनोळखी असल्यामुळे त्याची ओळख पटविणे चालू आहे. समोरील तपास शेगावं पोलीस स्टेशन चे ठाणेदार आणी त्याचे सहकारी करत आहे