गडचिरोली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांची नाकाबंदी सुरू असून वाहनांची कसून चौकशी केली जात आहे.गुरुवार (२१ मार्च ) रोजी मुलचेरा पोलिसांचा नाकाबंदी सुरू असताना दारू वाहतूक करणाऱ्या वाहनाला पोलिसांनी थरारक पाठलाग करून देशी दारूसह तब्बल ७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.चारचाकी वाहनातून दारू वाहतूक करणाऱ्या निखिल दीपक आत्राम (वय २६ वर्ष) राहणार मित्र नगर आकाशवाणी रोड चंद्रपूर, मंगेश हनुमान सातपुते (वय २४ वर्ष) राहणार खोची,भद्रावती चंद्रपूर या दोघांना मुलचेरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी मुलचेरा पोलिसांचा नाकाबंदी सुरू असताना आष्टीकडून मुलचेराकडे भरधाव येणाऱ्या एम एच ०२ बी वाय ८१५४ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, चालक न थांबता मुलचेरा कडे न जाता चक्क गट्टा-बोलेपल्ली दिशेने सुसाट वेगाने गेला. त्यानंतर पोलिसांनी सिनेस्टाईल थरारक पाठलाग करत गट्टा गावाच्या अलीकडे वाहनाला पकडून तपासणी केली असता त्यात देशी दारू वाहतूक करत असल्याचे आढळले.२ लाख ४० हजारांची (३० पेटी देशी दारू) आणि ५ लाख रुपये किंमतीचे (चारचाकी वाहन) असे एकूण ७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल मुलचेरा पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला.
होळी आणि धुलीवंदन असल्याने परराज्यातून व लगतच्या जिल्ह्यातून दारू तस्करी केली जात आहे.सदर वाहन चंद्रपूर जिल्ह्यातून आष्टी- मुलचेरा मार्गे आलापल्ली कडे येत होती.मात्र रस्त्यावर मुलचेरा पोलिस दिसताच दारू तस्कर भरधाव वेगाने दुसऱ्या मार्गाने म्हणजेच गट्टा मार्गाने पसार होण्याचा प्रयत्न केला.अश्यात पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करूत दारू तस्करांना ताब्यात घेतले आहे.
नाकाबंदी दरम्यान पोलिसांना चकमा देऊन दारू तस्करी करण्याचा प्रयत्नात असणाऱ्या एका चारचाकी वाहनासह दोघांना मुलचेरा पोलिसांनी पकडले आहे.ही कारवाई गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गट्टा रस्त्यावर करण्यात आली.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात मुलचेराचे ठाणेदार अशोक भापकर आणि त्यांच्या चमुने केली आहे.पुढील तपास सुरू आहे.