अहमदनगर (प्रतिनिधी) अहमदनगर जिल्ह्यातील
अकोले तालुक्यातील देवढाण येथील आढळा प्रकल्पाच्या पाटबंधारे खात्याच्या वसाहतीमधील गोडाऊनला अचानक आग लागल्याने पाटबंधारे खात्याच्या विविध प्रकारच्या लाकडी लोखंडी चांगल्या वस्तूंसह कागदपत्र जळून खाक झाली. नेहमीप्रमाणे पाटबंधारे कर्मचारी दोन तासाने तेथे हजर झाले परंतु तोपर्यंत सर्व साहित्य जळुन गेले होते.
पाटबंधारे खात्याच्या वसाहतीत या आढळा धरणाचे काम सुरु झाले होते तेव्हा म्हणजे सन 1974 पासून या गोडाउन मध्ये विविध प्रकारच्या वस्तू व सामान साठवले जात होते. या गोडाऊन च्या आसपास मोठ्या प्रमाणात गवत पालापाचोळा साचलेला आहे. परंतु या गोडाऊन जवळ राखण्यासाठी एकही कर्मचारी नसल्याने येथे भयान असे वातावरण आहे.
अचानक आग लागल्याने शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी आगीचे लोळ गोडाऊन मधून बाहेर येताना दिसल्यानंतर पाटबंधारे खात्याच्या कार्यालयाला दूरध्वनीवरून माहिती दिली. अकोले येथील पाटबंधारे खात्याचे कार्यालयाने हे गोडाऊन नेमके कोणत्या पाटबंधारे खात्याचे आहे. मध्यम प्रकल्प पाटबंधारे खात्याचे आहे का.याची शोधाशोध सुरू झाली. अखेर हे कोणालाच न समजल्याने मध्यम प्रकल्पाचे पाटबंधारे कर्मचारी तेथे हजर झाले. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना माहिती दिली.वरिष्ठांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धावाधाव सुरू झाली.
अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या अग्नीशमन बंबाने आग विझविण्यासाठी प्रयत्न केला.तोपर्यंत सगळे गोडाउन जळून खाक झाले होते शासनाच्या वस्तू कागदपत्र यात जळून गेले होते.