भामरागड :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात विविध राजकीय पक्षाचे प्रचार व जनसंपर्क कार्यालये उघडण्यात येत आहेत व आपल्या उमेदवाराला प्रथम प्राधान्य देऊन प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आव्हान जनतेला देण्याचे काम जोमाने सुरु आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली – चिमूर या लोकसभेकरिता उभे असलेले उमेदवार इंडिया आघाडी तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ व कार्यकर्त्यांना प्रचार दरम्यान विसावा घेण्याकरिता तसेच बैठका आणि चर्चे करिता आज (6 एप्रिल) तालुका मुख्यालयातील भामरागड येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष लक्ष्मीकांत बोगामी, महिला तालुका अध्यक्ष शारदा कंबोगोनिवार,जेष्ठ नेते तथा माजी अध्यक्ष नगर पंचायत भामरागड राजू वड्डे,तालुका अध्यक्ष आदिवासी विद्यार्थी संघटना सुधाकर तिम्मा, माजी सभापती पंचायत समिती भामरागड सुखराम मडावी,प्रतिष्टीत व्यापारी तथा राष्ट्रीय काँग्रेस चे नेते आसिफ सुफी, वामन ऊईके,विजय कुडयामी, कोलू पुंगाटी, दसरू लेकामी, सत्तू मट्टमी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.