आलापल्ली:- आजची पिढी ही अत्यंत संबेदनशील असून त्यांची आकलनशक्ती प्रभावी असते. या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविणे ही गरज असल्याचे प्रतिपादन अहेरीचे ठाणेदार मनोज काळबांचे यांनी केले.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, कुमार चिंता, एस. रमेश यांच्या संकल्पनेतून तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनात अहेरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आलापल्ली येथील क्रीडा संकुल सभागृहामध्ये जनजागरण मेळावा व आदिवासी रेला नृत्य कार्यक्रम ११ डिसेंबर रोजी संपन्न झाला.
यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अहेरीचे नायब तहसीलदार हमीद सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख अतिथी म्हणून आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, राणी दुर्गावती हायस्कूलचे प्राचार्य लोनबले, राजे धर्मराव हायस्कूलचे प्राचार्य एच. बी. खोब्रागडे,साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उप निरीक्षक रुपाली काळे, पोलीस उपनिरीक्षक करुणा मोरे, पोलीस उपनिरीक्षक करिश्मा मोरे, सुनील तोरे मेजर, सुरेश मडावी, शंकर येरमे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना काळबांधे यांनी, आदिवासीबहुल भागातील विद्याथ्यांमध्ये अनेक सुप्त गुण असून त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळाल्यास ते विविध क्षेत्रात पुढे जाऊ शकतात. त्यासाठी गडचिरोली पोलीस दल पुरेपूर प्रयत्न करीत आहे. त्यामुळे युवक आणि युवतींनी विविध क्षेत्रात पुढाकार घेऊन सातत्याने प्रयत्न करावे. यासाठी योग्य व्यासपीठ देण्याचे काम पोलीस विभागामार्फत करण्यात येईल, असेही त्यांनी आश्वासन दिले. एवढेच नव्हे तर, जनजागरण मेळावा व रेला नृत्य कार्यक्रमात सहभागी झालेल्या युवक-युवतींना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
आयोजित कार्यक्रमात परिसरातील ११ शाळेतील विद्याथ्यर्थ्यांनी रेला नृत्यात सहभाग घेतला. यातील शंकरराव बेझलवार कला वाणिज्य महाविद्यालय अहेरीने तृतीय क्रमांक, काली कंकाली रेला डान्स ग्रुप चुटुगुंटा द्वितीय क्रमांक तर आदिवासी मुलांचे वसतिगृह आलापल्लीने प्रथम पारितोषिक पटकाविले.तीनही चमूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आकर्षक शिल्ड, प्रशस्तीपत्र
व रोख रक्कम देऊन गौरविण्यात
आले. एवढेच नव्हे तर उपस्थित
विविध चमुंना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. रेला नृत्यासाठी परीक्षक म्हणून एस. बी. कॉलेज अहेरीचे सांची बन्सोड मॅडम,तर राणी दुर्गावती
विद्यालय आलापल्लीचे सिलमवार आणि अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रुपाली काळे यांनी काम केले. संचालन पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे यांनी केले.
यावेळी सदर मेळाव्यात राबविन्यात येनाऱ्या विविध शासकीय योजनाची माहिती देउन लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले.
तसेच सर्व उपस्थिताना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
यशस्वीतेसाठी अहेरी पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले