गोंडपिपरी -(सुरज माडूरवार) : तालुक्यातील वढोली येथील युवा शेतकऱ्याचा शेतात काम करताना आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना दि (९ ) मंगळवारी सायंकाळी ६ वाजता दरम्यान उघडकीस आली.
वढोली येथील शेतकरी शांताराम जानकिराम चुदरी वय( ४५) शेतात कचरा पेटवण्यासाठी सकाळी ११ वाजता गेले सायंकाळ झाली तरी ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी गावात शोध घेतला नंतर शेताकडे जाऊन बघितल्या नंतर शेतात मृतावस्थेत आढळले.त्यांच्यावर कर्जाचे डोंगर होते कुटुंबातील ते एकटे कमावते कर्ते होते.कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला कुटुंबियांना सानुग्रह निधी तुन मदत शाशनाने करावी अशी मागणी गावाकऱ्यांनी केली आहे.मृतदेह शेतात असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली ठाणेदार रमेश हत्तिगोटे घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठीवले.बुधवारी मृतकाचे अंतिम संस्कार पार पडले.त्यांच्या पच्यात आई,पत्नी,मुलगा,मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.