बीड प्रतिनिधी:(वैभव वाघमारे )
कृषि शासन शेतकरी उत्पादक कंपनीची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यामध्ये कंपनीने मागील एका वर्षाचा लेखा जोखा, कंपनीच्या कार्य अहवालाचे व ३०१ सभासद झाल्याची माहिती कंपनीचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित हराळे यांनी दिली. शिंदे यांनी शेतकरी यांना देण्यात येणाऱ्या सेवा व उत्पादन वाढ आणि मुल्यवृध्दीसाठी कशी कार्यरत आहे याची माहिती दिली. कंपनीने ऑनलाईन सेवा आणि कृषि सेवा केंद्र अल्प दरात उपलब्ध करून दिलेल्या आहेत तसेच उत्पादन वाढीसाठी सेवा व भाववाढीचे केलेले प्रयत्न यावर फोकस करण्यात आले आहे.भविष्यात कंपनी स्वताच्या जागेत असेल आणि १००० शेतकऱ्यांना सेवा देईल असे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी प्रा. सुहास पंके, दीन दयाळ कृषि विज्ञान केंद्र दिगोळ अंबा हे अथिती म्हणून मार्गदर्शन केले. वर्षभरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वैजिनाथ कदम, शंकर काळे, दत्ता कानडे, मेघराज काळे, विश्वनाथ सातपुते यांचा गौरव करण्यात आला. तसेच संचालक संदीपान मस्के, लक्ष्मण जाधव, अमोल सावंत, दत्ता कानडे व सभासद १७६ संभासद उपस्थित होते.