गोंडपिपरी :- राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्याकडून गोंडपिंपरी तालुक्याच्या विकासाकरिता वेगवेगळ्या पटलावर प्रयत्न सुरू होते. अशावेळी अचानक सत्ता बदल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात विकास निधीवर यावेळच्या राज्यकर्त्यांनी ब्रेक आणला. दरम्यान न्यायालयीन लढाईनंतर स्टे उठला व प्रस्तावित कामांना चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.आमदार धोटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि त्यांच्या सरकारला वेठीस धरणाच्या भूमिकेमुळे ग्रामीण रस्ते विकासाच्या निधीचा प्रश्न सुटला. ४ कोटी ३० लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन दि (३०) शनिवारी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते तालुक्यातील विविध गावात संपन्न झाले .
करंजी गावात २५ लक्ष रुपये खर्चून गुरुदेव सेवा मंडळालगत समाज भवनाचे बांधकाम केल्या जाईल.पुन्हा याच गावात तेथील राजमाता बहुउद्देशीय संस्थेजवळ सुध्दा समाजभवनाचे बांधकाम होणार असून त्यासाठी ३० लाखाचा खर्च मंजूर आहे.तालुक्यातील धानापूर (साईनगरी) येथील क्रीडा संकुल ते संजय पूड्डटवार यांचे घरापर्यंत २० लाखाचा निधी खर्चून सिमेंट कॉन्क्रेट रस्ता बांधकाम केल्या जाणार आहे.घडोली गावात नवीन वाचनालयाची इमारत लवकरच उभी होईल.यासाठी २० लक्ष रुपयांचा खर्च मंजूर आहे.याशिवाय तालुक्यातील चेकघडोली गावातर्गत रामा-३५३ बी ते प्रजिमा -४८ नांदगाव रस्ता एलआर-०५,व्हीआर-५९ मार्गाचे काम ३ कोटी २० लक्ष रुपयाचा निधी खर्चून पूर्ण होणार आहे.गणेशपिपरी येथील अमित दुर्गे ते विजय गुरूनुले,ग्रामपंचायत ते दवाई कळते यांचे घरापर्यंत सिमेंट कॉन्क्रेट रस्ता बांधकामाला सुरवात होईल.त्यासाठी १५ लाखाचा निधी मंजूर आहे.दरम्यान गोंडपिपरी तालुक्यात एकूण ४ कोटी ३० लाखाच्या विकासकामांचे भूमिपूजन क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र बट्टे,तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे,महिला तालुका अध्यक्ष सोनी दिवसे,नगराध्यक्ष कुळमेथे,कार्याध्यक्ष निलेश संगमवार,शहर अध्यक्ष राजू झाडे,तालुका उपाध्यक्ष नीतेश मेश्राम,नगरसेवक सचिन चींतावार,ग्रा पं सदस्य महेंद्र कुनघाटकर,अशोक रेचंनकर,रंजना रामगिरकर,नगरसेविका वनिता वाघाडे,अनिल झाडे,सारनाथ बक्षी,माजी उपसरपंच गौतम झाडे,विनोद नागापूरे,श्रीनिवास कंदणुरीवार, तुकेश वानोडे,रेखा रामटेके,आशिष निमगडे,उपसरपंच हरिदास मडावी,प्रा शंभू येलेकर,नामदेव सांगळे यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.