logo

HOME   महाराष्ट्र

निळ्या पाखरांनी रक्तदान करून महामानवाला केले अभिवादन

निळ्या पाखरांनी रक्तदान करून  महामानवाला केले अभिवादन

  आकोट (अकोला ):-  तालुक्यातील अकोलखेड येथील फुले,शाहू आंबेडकर शिक्षण प्रसारक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सकाळी 11 वाजता करण्यात आले होते.शिबीरात २६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.सर्वप्रथम भगवान गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन  करुन अभिवादन करण्यात आले.शिबीराचे उद्घाटन अकोटचे माजी नगराध्यक्ष तथा उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमेटी ग्रामिण अकोला प्रा.संजय बोडखे यांनी केले.शिबीरात काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते बजरंगराव तळोकार,उपसरपंच जगन्नाथ निचळ,तंटामुक्ती अध्यक्ष शे.जब्बार शे.आबू,ग्रा.पं.सदस्य ज्ञानेश्वर देऊळकर,माजी ग्रा.पं.सदस्य शेखजी पहेलवान,डॉ .प्रभाकर नगराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक ललित नगराळे यांनी केले.शिबीरात अकोला स्त्री रुग्णालयाचे डॉ.चिमणकर, गोविंद पचांगे,विक्की शेळके,राहुल इंगोले,अक्षय इंगोले यांनी सेवा दिली.रक्तदान शिबीरात करुणेश मोहोड,प्रदिप सिरसाट,राहुल मोहोड,उमेश खैरे,केशवराव लांडे,ईस्माइल खॉ,विजय पाटील,भोजराज धुवे,सुधिर खैरे,वैभव यवतकार,अमरदिप शंभरकार,जयंत लोखंडे,आनंद तेलतुंबडे,धर्मराज धुवे,सदानंद टिपले,ज्ञानेश्वर कावरे,स्वप्नील नगराळे,नितीन रामटेके,दिनेश तोताडे,श्रीधर तळोकार,साहेबराव पाटील,नितेश जांभळे,मुकेश तोताडे,भूषण जांभळे,चरणदास अकर्ते,मुकेश वानखडे आदींनी रक्तदान केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमोल किटके,नागेश लोखंडे,योगेश काळे,प्रसाद पुडके,सागर गावंडे,सुमित नगराळे,मंगेश मोहोड,गौरव नगराळे,विपूल जवादे,संदिप सिरसाट,पुष्कर किटके,आदित्य नगराळे,विवेक सिरसाट,सुरज किटके,सचिन काळे,भारत सिरसाट,चेतन पाटील आदींनी अथक परिश्रम घेतले.Top