logo

HOME   महाराष्ट्र

तब्बल दोन वर्षानंतर छगन भुजबळांची विधानभवनात “एन्ट्री”

तब्बल दोन वर्षानंतर छगन भुजबळांची विधानभवनात “एन्ट्री”
नागपूर : तब्बल दोन वर्षानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची नागपूर मधिल विधानभवनात जोरदार एन्ट्री झाली.अधिवेशनाच्या दुस-या आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजात त्यांनी सहभाग घेतला.अधिवेशनाच्या दुस-या आठवड्यातील कामकाजाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी कामकाजात भाग घेतला. आज कामकाज सुरू होण्यापूर्वी भुजबळ यांचे विधानभवन परिसरात आगमन झाले.त्यांच्या स्वागतासाठी अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांच्यासह, राष्ट्रवादीचे नेते आमदार उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी” कौन आया कौन आया, राष्ट्रवादीका शेर आया अशा घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.


Top