logo

HOME   ताज्या बातम्या

अखेर त्या वादग्रस्त मुख्याधिकारीने राजीनामा ठोकला!

अखेर त्या वादग्रस्त मुख्याधिकारीने राजीनामा ठोकला!

मुंबई (विशेष प्रतिनिधी )   महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागातील वादग्रस्त मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी २९ जुलै २०१९ ला राजीनामा देऊन ३१ ऑगस्ट २०१९ ला मध्यान्हानंतर राजीनामा स्वीकृत करुन शासकिय सेवेतुन कार्यमुक्त करण्याची विनंती केली असून नगर विकास विभाग मंत्रालयाने अहवाल मागीतलेला आहे. सुधीर शंभरकर, प्रादेशिक उप संचालक नगर परिषद प्रशासन नागपुर यांनी प्रादेशिक उप संचालक विभागीय आयुक्त अमरावती यांचा २६ ऑगस्ट २०१९ चे पत्र तसेच उप संचालक नगर परिषद संचालनालय मुंबई यांचा दि २३ ऑगस्ट २०१९ च्या पत्रांचा संदर्भ देऊन २८ ऑगस्ट २०१९ ला देसाईगंज, रामटेक ,कळमेश्वर ,नरखेड, पवनी या नगर परिषद मधुन तसेच चंद्रपुर व भंडारा या जिल्हा प्रशासन अधिकारी नगर पालिका प्रशासन येथुन रुजु दिनांक, कार्यमुक्त दिनांक, ना देय प्रमाणपत्र, ना विभागीय चौकशी प्रमाणपत्र व इतर विशेष बाबतीत माहिती मागीतलेली आहे.वादग्रस्त मुख्याधिकारी माधुरी मडावी यांना बडतर्फ करण्याबाबत तत्कालिन नगर विकास राज्यमंत्री माननिय भास्कर जाधव यांनी २१ जुलै २०१२ ला पावसाळी अधिवेशनात विधिमंडळात घोषणा केली होती. परंतु आठ वर्षापासुन अद्याप बडतर्फ करण्यात आले नव्हते.  दरम्यान, देसाईगंज जि गडचिरोली,रामटेक जि नागपुर , या नगरपरीषदने नगर परिषद पदाधिकारी व सदस्यांना वारंवार अॅट्रासिटीच्या खोट्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देत असल्याने अविश्वास ठराव क्रमांक ५७१/२०१० अन्वये दि ८ जुन २०१० ला पारित करुन या अविश्वास ठराव्याच्या आधारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपिठात याचिका टाकुन अल्पावधीतच त्या ठिकाणाहुन स्थानांतरण केलेले होते.अशाच प्रकारची तक्रार अकोला मनपा आयुक्त डॉ. लहाने यांच्या विरुद्ध देखिल तक्रार दिली होती.या वादग्रस्त मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्यावर देसाईगंज,रामटेक,अकोला,पवनी पोलीस स्टेशन मध्ये गंभीर गुन्हे दाखल असुन स्थानिक नागरीकांवर व त्याानंच्या मनमानी भोंगळ कारभार व भ्रष्टाचार बाबतीत बातम्या प्रकाशित केल्याने पत्रकारांविरुध्द प्रत्येक नगरपरीषद क्षेत्रातील पोलीस स्टेशन मध्ये  खोट्या तक्रारी केल्या आहेत. तथापी,नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या मूख्याधिकारी माधुरी मडावी यांचा  दि .११.११.२००८ पासून परिविक्षाधीन कालावधी संपूष्ठात आलेला नसून रामटेक येथे कार्यरत असतांना त्यांचे विरूद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शि. व अ.) नियम १९७९ नियम ८ खाली प्रस्तावित केली असून सदर शिस्तभंग विषय कारवाई परिविक्षाधीन कालावधी दरम्यान असल्यामुळे कारवाई प्रलंबित असल्यास विभागीय चौकशी पूर्ण होई पर्यंत परिविक्षाधीन कालावधी वाढविण्यासाठी नगर विकास विभागाने राज्यपाल च्या आदेशानुसार ६ सप्टेंबर २०१६ ला काढलेला होता. ज्या ठिकाणी मुख्याधिकारी माधुरी मडावी  कार्यरत होत्या त्या त्या ठिकाणी त्या नेहमीच वादग्रस्त ठरल्या आहेत.प्रत्येक ठिकाणीच नगरपरीषद पदाधिकारी व सदस्यांविरुद्ध स्थानिक नागरीकांवर व पत्रकारांवर अॅट्रासिटीची खोट्या तक्रारी करित होत्या.भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे पोलीस स्टेशन पवनी येथे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता,भंडारा जिल्ह्यातील लाखांदुर नगर पंचायत चा अतिरिक्त पदभार असतांना ई निविदा बाबतीत अनियमितेबाबत पत्रकार यांनी बातम्या प्रकाशित केल्याने तिथे ही पोलीस स्टेशन लाखांदुर ला खोट्या तक्रारी केली होती. तिथुन नरखेड जि नागपुर येथे उचलबांगळी झाल्यानंतर मंदार नदिवरिल पुल पहाटेला तोडने चांगलेच महागात पडले होते. यामुळे नरखेड मधील वातावरण चांगलेच तापले होते तेथुन अमरावती येथे सहायक संचालक गट-ब प्रादेशिक संचालक ( मुख्याधिकारी गट-ब संवर्ग) या पदावर २४ जुलै २०१९ चा पाठवुन प्रकरणाला शांत करण्यात आले होते.

 नेहमी वादग्रस्त ठरलेल्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचा कालावधी पासुन अद्याप विभागीय चौकशी सुरूच असुन २१ जुलै २०१२ ला विधिमंडळात तत्कालिन नगर विकास राज्य मंत्री नामदार प्रकाश जाधव यांनी मुख्याधिकारी पदासाठी लायक नसलेल्या माधुरी मडावी यांना.बडतर्फ करण्याची घोषणा केली होती. मात्र आता खुद्द माधुरी मडावी यांनीच राजीनामा दिल्याने नगर विकास विभाग मंत्रालयाला नेहमी च्या कटकटीतुन कायमची मुक्ती मिळणार आहे.Top