logo

HOME   ताज्या बातम्या

अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या तुळस येथील ग्रामस्थांना भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ताडपत्री वाटप

अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या तुळस येथील ग्रामस्थांना भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ताडपत्री वाटप

वेंगुर्ले :- तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे सर्वात जास्त नुकसान तुळस ग्रामपंचायत हद्दीत झाले . बरयाच घरांना त्यामुळे धोका निर्माण झाला आहे , अशा ग्रामस्थांना तातडीची मदत म्हणून भाजपा प्रदेश चिटनीस राजन तेली यांच्या तर्फे  ताडपत्री देण्यात आली. तुळस - फातरवाडा येथील बाळु बेहेरे तसेच  तुळस - लींगदांडा येथील रसीका परब यांना भाजपा तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई व तुळस गावचे सरपंच शंकर घारे यांच्या हस्ते ताडपत्री देण्यात आली .
    यावेळी तुळस उपसरपंच जयवंत तुळसकर , शक्ती केंद्र प्रमुख संतोष शेटकर , मच्छिमार नेते दादा केळुसकर , ग्रामपंचायत सदस्या सौ. शीतल नाईक , माजी सरपंच भाऊ नाईक , सचिन नाईक , भगवान परब , राजु नाईक इत्यादी उपस्थित होते.


Top