logo

HOME   ताज्या बातम्या

सबका साथ सबका विकास क्या सुनोगे हमारी बात ?

आमदार आमदार बच्चु कडू यांचे फडणवीस सरकारला सवाल अचलपूर चे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावा नाहीतर अन्न त्याग

सबका साथ सबका विकास   क्या सुनोगे हमारी बात ?

    मुंबई - 'सबका साथ सबका विकास' या घोषणे वर पंतप्रधान मोदी पुन्हा सत्ता वर आले मात्र त्यांच्या सोबत सबका विकास चा नारा देणारे आमचे मुखमंत्री सोईस्करणे आमच्या मतदार संघाच्या विकासकडे दुर्लक्ष करीत आहे या सरकारची मुदत संपत आली असून अजून किती वाट पहायची  ? असा सवाल करीत हे सर्व प्रलंबित विषय मार्गी लागले नाही तर आज विधानसभा संस्थगित झाली तरी मी छत्रपतीच्या पायाशी बसून  अन्नत्याग सुरू करिन असा इशारा  आमदार बच्चु कडू यांनी दिला
या बाबत समजते की आमदार आमदार बच्चु कडू यांनी दिनांक 10-6-2019 रोजी राज्याच्या मुखमंत्री याना या बाबत पत्र देऊन इशारा देताना महसूल,आरोग्य, मदत व पुनर्वसन, पाणी पुरवठा, कृषि, उद्योग, वैद्यकीय शिक्षण  अशा 10 खात्याकडे मतदार संघातील प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्यात म्हणून निवदेन व इशारा दिला होता पण आज एक महिना झाला तरी सरकारने याकडे  कानाडोळा केला आहे ,कसा होणार आमचा विकास? आमचा विकास करणार की नाही ? असा खोचक सवाल त्यांनी या पार्श्वभूमीवर केला आहे. राज्य विधान मंडळाचे या सरकारचे शेवटचे अधिवेशनाचे आज सूप वाजणार आहे.  त्या नंतर आचारसंहिताचे भुत येणार आहे. त्यामुळे माझ्या मागण्यांना वाटाण्याच्याअक्षता लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कोणत्या ही परिस्थितीत या बाबत मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन माझे प्रलंबित प्रश्र आज मार्गी लावले  नाही. तर विधानसभा संस्थागीत झाली तरी माझे उपोषण सुरूच राहणार आहे असे आमदार बच्चु कडू यांनी ठामपणे सांगितले.आपल्या मागण्यांच्या निवेदनात आमदार कडू यांनी अचलपूर येथे शासकीय वेधकीय महाविद्यालय स्थापन करणे, विदर्भ मिल कामगारांना राहत्या ठिकाणी घरकुलाचा लाभ देणे .

अचलपूर MIDC चा विस्तार आणि चांदुर बाजार MIDC ची स्थापना करणे, परतवाडा येथील बंद पडलेले दूध शितकरण केंद्र पुन्हा सूर करणे, अचलपूर येथे 300 एकर जागेवर कृषि महाविद्यालयाची स्थापना करणे, पूर्ण प्रकल्पातील 14 गावाच्या पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करणे बेलोरा व राजुरा येथील शेतकऱ्यांच्या 
जमिनीच्या सिंचनाची  राखीव पाणी देऊन व्यवस्था करणे, प्रकल्पग्रस्त 375 कुटुंबाना घरबांधणी करीता 15 लाखाचे अनुदान देणे, बेलोरा प्रकल्पा तातडीने सुप्रमा देऊन निधी देणे, मुखमंत्री महोदयांनी आश्वासन देऊनही  न झालेल्या बोरगाव पेठ गावाचे  पूर्ण पुनर्वसन करण्याची अधिसूचना काढणे, नवीन भूसंपादन कायदया अगोदर जमिनींची खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना 10 लाख रुपये प्रती कुटुंब मदत देणे, प्रकल्पग्रस्त भूमिहीनाना शासकीय सेवेत प्राधान्य तसेच नोकरी मिळेपर्यंत 5000 रुपये प्रतिमहा मानधन, नवीन भुसपादन पुनर्वसन कायदा पुनर्वसन व पुनर्स्थापना करिता पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावा,अचलपूर जिल्हा निर्मिती चांदूरबाजार मधील आसेगाव चिखलदरा येथील सामान्य व ग्रामीण रुग्णालय , आसेगाव पुणे येथील रुग्णालय इमारत बांधकामास प्र. मा देऊन निधी दयावा, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथील आवश्यक पद भरती करावी आदी मागण्यांबाबत मी आग्रही आहे आणि मी माझ्या अन्नत्यागावर ठाम आहे असे कडू यांनी यावेळी सांगितले


Top