logo

HOME   महिला जगत

जागतिक महिलादिनानिमित्त ५१ महिलांचा 'स्त्रीशक्तीपीठं ' पुरस्काराने गौरव 

महिलांनी चौकटीच्या बाहेर राहून स्वतःला सिद्ध करावे - डॉ. वर्षा लहाडे  

  जागतिक महिलादिनानिमित्त ५१ महिलांचा 'स्त्रीशक्तीपीठं ' पुरस्काराने गौरव 


जळगाव ;- समाजात वावरतांना स्त्रिया चौकटीत राहून व चौकटीबाहेर कार्य करीत असून चौकटीत कार्य करणाऱ्या महिलांनी आपल्या कामाला कमी मानू नये व चौकटीबाहेर राहणाऱ्या स्त्रियांनी स्वतःला सिद्ध करावे ,चौकटीत राहणाऱ्या स्त्रिया अबला व चौकटीबाहेर काम करणाऱ्या स्त्रिया सबला असा काही प्रकार नसून जेव्हा महिलांना समाजाकडून सामान वागणूक मिळेल तेव्हाच सबलीकरण व सशक्तीकरण यशस्वी होईल असे प्रतिपादन प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ् डॉ. वर्षा लहाडे यांनी आज येथे केले . 

जागतिक महिलादिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ , बी.एम. फाउंडेशन आणि नजर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५१ महिलांचा 'स्त्रीशक्तीपीठं ' पुरस्काराने गौरव सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर ,तर उदघाटक पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे , जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वलाताई पाटील , महापौर ललित कोल्हे , माजी आमदार आर. ओ . तात्या पाटील , माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील , समाज कल्याण अधिकारी अनिता राठोड , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. कमलापूरकर , जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील , वैशाली कोकाटे , पोलीस निरीक्षक सुनील कुराडे ,  अनिल अडकमोल , नीता वाघ , मुकुंद सपकाळे , ऍड . राजेश झाल्टे , पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा , उद्योजिका ममता राठी , मुकेश सोनवणे ,, मीनल केदार हरिश्चंद्र सोनवणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते . 

यावेळी बोलताना डॉ. वर्षा लहाडे म्हणाल्या कि , वयात येणाऱ्या लहान मुलींना पालकांनी समजून घेत त्यांच्याशी मैत्रीरुपाने संवाद साधावा . स्त्रियांचा सन्मान करणे हे लहान मुलांना शिकविण्याची गरज असून महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन व्यायाम करावा . उच्च शिक्षण महिलांनी आत्मसात करून आपले ध्येय गाठावे . यासाठी पुरुषांनीही महिलांना प्रोत्साहन द्यावे असे डॉ. लहाडे यांनी यावेळी सांगितले . यावेळी त्यांनी उपस्थित महिलांना उपयुक्त टिप्स देऊन मार्गदर्शन केले . 


महिलांनी आरोग्य जपावे - डॉ . कमलापूरकर 

महिलांचे आरोग्य व्यवस्थित असेल तर महिला समजत वावरताना सक्षम राहू शकतील . आरोग्य सांभाळून त्यांनी कुटुंब व समाजाचा उधार करावा असे मत जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. बी.एस. कमलापूरकर यांनी व्यक्त केले . 


स्त्रियांनी स्वतःला ओळखावे -   आर. ओ . तात्या पाटील

महिलांनी स्वताला ओळखून समाजात कार्य करीत राहावे . महिला याच त्यांच्या जीवनाच्या शिल्पकार असून त्यांनी आपल्या हक्काची जाणीव इतरांना करून द्यावी . महिलांनी स्वतःच्या शक्तीला ओळखावे - दत्तात्रय कराळे 


महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये महिलांचाच अधिक सहभाग असल्याचे आढळून आल्याची खंत पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बोलताना व्यक्त केली . महिलांनी महिलांकडे पाहण्याची भूमिका बदलायला हवी त्यांच्याकडे नणंद , सून, सासू म्हणून न पाहता आई बहीण म्हणून  मानल्यास महिलांच्या तक्रारी कमी होईल . यावर आत्मपरीक्षण करून स्वतःच्या शक्तीला ओळखावे असे दत्तात्रय कराळे यांनी सांगितले . 
एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली - जिल्हाधिकारी 


भारताला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली सर्वच क्षेत्रात महिलांनी क्रांती केली आहे . उमविच्या पदवी प्रदान सोहळ्यात ७५ टक्के महिलांनी सुवर्णपदके मिळविली हि अभिमानाची बाब आहे . प्रशासन महिलांसाठी प्रयत्न करीत आहे . आज नाते  सम्बन्ध जोपासणे आवश्यक झाले असून एकत्र कुतुंमपद्धती लोप पावत चालल्याने एकमेकांच्या नातेसंबंधात दुरावा निरामन होत असून तो वाढीस लागावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी बोलताना व्यक्त केले . 

यावेळी हरिजन छात्रालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत म्हटले . तसेच चाळीसगावच्या महिला संघातर्फे महिलांवरील अत्याचाराचे सादरीकरण करण्यात आले . प्रास्ताविकातून प्रवीण सपकाळे यांनी आपली भूमिका विशद केली . यावेळी त्यांनी मयत १०० शेतकऱयांच्या पाल्यांचा शैक्षणिक खर्च उचलून त्यांना नजर फाउंडेशन दत्तक घेणार असल्याची माहिती दिली . यावेळी योगेश नन्नवरे , उद्योजक ममता राठी , माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील , स्मिता  बच्छाव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले . सूत्रसंचालन मिलिंद केदार तर आभार नजर फाउंडेशनचे सचिव दीपक सपकाळे यांनी मानले . तसेच कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली . 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष ढिवरे , रियन जहागीरदार , भूषण महाजन , बबलू सोनवणे .सुनील वाघ,दिलीप पाटील , इम्रान शेख , रितेश माळी , ऍड. सीमा बिहाडे आदींनी परिश्रम घेतले .

यांचा झाला स्त्रीशक्तीपीठाने सन्मान *
डॉ. वर्षा लहाडे ,स्मिता बच्छाव ,डॉ. गीतांजली ठाकूर,अंजली बाविस्कर,प्रतिभा सोनवणे,वैशाली कोकाटे,वैष्णवी डंबेलकर, सरिता माळी,करिष्मा पाटील,डॉ. सरोज पाटील,पुष्पा  पाटील,योजनाताई पाटील,शोभा हंडोरे,कु. प्राजक्ता सोनवणे, विद्या सोनार,मनीषा जोशी, पल्लवी जोशी, श्रद्धा पाटील-शुक्ल , मनीषा बागुल , सुनंदा चौधरी,नाजनीन  शेख रईस , जयश्री महाजन , फातेमाबी बेलदार , शैला रणधीर , वैशाली पाटील, ऍड . शिल्पा रावेरकर, रुपाली वाघ, कल्पना चित्ते , अलका चौधरी, निर्मला चौधरी, आशा पाटील, निवेदिता ताठे , निर्मला निकम, विजया हटकर, कु . हर्ष सरोदे, छाया गडे , वैशाली चौधरी , वैशाली विसपुते, शैला चौधरी, वैशालीताई पाटील, शोभाताई चौधरी, मंगलाताई बारी, रेखा पाटील, वैशाली कुराडे , वैशाली बोरकर -सोनवणे , मयुरी बिल्दीकर , सुनीता पाटील, जयश्री सुनील महाजन , छाया पाटील , मीनल केदार . 


Top