logo

HOME   महिला जगत

महिला दिन विशेष..... महिला अजून सक्षम व सामर्थ्यवान बनावे : सौ. शाहीन हकीम

महिला दिन विशेष..... महिला अजून सक्षम व सामर्थ्यवान बनावे : सौ. शाहीन हकीम
आज कुठल्याच क्षेत्रात महिला मागे नसून अजून पुढे येण्यासाठी महिला सक्षम व सामर्थ्यवान बनावे .पुरुष प्रधान देशात महिला प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन पुरुषांच्या बरोबरीने चालत असले तरी अजून पुढे येण्याची गरज आहे. आज ८ मार्च जागतिक महिला दिनी सर्वांना शुभेच्छा!
खरे तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहशिक्षिका फातिमा शेख यांच्या अथक परिश्रम आणि संघर्षाने त्यांची प्रेरणा घेवून महिला आज स्वाभिमानाचे जिणे जगत आहेत...स्वातंत्र्य पूर्व व नंतरच्याही काळात ’चूल आणि मूल’ इतकेच कार्यक्षेत्र महिलांचे होते..परंतू क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडे क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले शिक्षणाचे धडे गिरवून सबंध महिला जातीला शिक्षणाचे दार खुले करून दिले.....शिक्षणामुळेच महिलांची प्रगती झाली असून अजून आगेकूच करण्यासाठी महिलांनी उच्च व दर्जेदार शिक्षण घ्यावे आणि सक्षम व सामर्थ्यवान बनावे.
शिक्षणातूनच महिलांची उन्नती होते पायलटच्या रूपाने अक्षरशः आकाशात गवसणी आणि राष्ट्रपती पदाच्या रूपाने देशाच्या सर्वोच्च पदावर आरूढ होणे ही किमया खास करून महिलांकरिता केवळ शिक्षणातूनच झाली आहे.
महिला राज आज देशात दिसत असले तरी असंख्य महिला आजही अन्याय अत्याचार मुकाट्याने सहन करीत आहेत..हा अन्याय अत्याचार हद्दपार करण्यासाठी महिला संघटित व एकत्र येणे हे सुध्दा काळाची गरज आहे.
महिलांनी स्वतः पुढाकार घेवून निदान दोन-तीन महिन्यांतून एकदा तरी गेट_ टुगेदर केले तरी एकमेकांच्या विचारांची देवाण घेवाण होते त्यातून समस्या मार्गी निघू शकतात...वन वैभव शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी मकर संक्रांत, कोजागिरी, दीपावली आणि विजयादशमीला खास महिलांकरिता स्नेह मिलन आयोजित करून वेगवेगळे उपक्रम राबवित असतो. अशा प्रकारचे विविध उपक्रम महिलांनी राबवावे यामुळे महिलांची ताकद एकत्र येवू शकते.आणि अन्याय_अत्याचाराचे प्रकाराला आपोआप आळा बसतो.
प्रत्येक पुरुषांच्या यशामागे स्त्रीचा हात असतो अगदी तसाच हात प्रत्येक स्त्रिच्या यशामागे पुरुषांचाही असायला पाहिजे ही परिस्थिती निर्माण करन्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावे. तेंव्हाच नक्कीपणाने महिला सक्षम व सामर्थ्यवान बनतील....आजच्या जागतिक महिला दिनी परत एकदा शुभेच्छा!

✍सौ.शाहीन बबलू हकीम,अहेरी.


Top