logo

HOME   महाराष्ट्र

वर्धा जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी कटिबद्ध - ना. सुधीर मुनगंटीवार

३५ कोटी रु. किंमतीच्या विकास कामाचे भूमिपूजन

वर्धा जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी कटिबद्ध - ना. सुधीर मुनगंटीवार

उत्तम रस्ते हे प्रगतीचे व विकासाचे राजमार्ग ठरतात. विदर्भाचा सर्व बाबींमध्ये असलेला अनुशेष दूर करण्यासाठी सर्व शक्तिनिशी काम करीत असून वर्धा जिल्ह्याचा समतोल विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन वित्त व नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. शिवाजी चौक ते जुनापाणी चौक या तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सिमेंटीकरण आणि सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन आज कारला चौक येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार पंकज भोयर, पिपरी मेघेचे सरपंच अजय गौळकार व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. हा रस्ता तयार करण्यासंदर्भात नगर परिषद निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द आज पूर्ण करीत असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. यासाठी आमदार पंकज भोयर यांनी पाठपुरावा केला. विशेष बाब म्हणून या रस्त्यांसाठी 35 कोटी रुपये मंजूर करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्याचे काम सोपवले आहे. सर्व कामे पूर्ण करण्याची इच्छा असुनही काही मर्यादांमुळे ते होऊ शकत नाहीत. ते पूर्ण करण्यासाठी जनतेच्या आशीर्वाद रुपी शक्तीची गरज असून ती शक्ती अशीच पाठीशी असू द्या असेही सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले. जिल्ह्यात महात्मा गांधी शिक्षण विद्यापीठ स्थापन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.Top