गडचिरोली : भामरागड तालुक्यातील हिदूर येथील एका महिलेचा रानटी हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. २५ एप्रिल रोजी कियर येथील गोंगलू रामा तेलामी या शेतकऱ्यास दुपारी ठार केल्यानंतर रात्री त्याच रानटी हत्तीने हिदूर गावात धुडगूस घालून तीन महिलांना गंभीर जखमी केले. त्यापैकी राजे कोपा हलामी (५०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर महारी देवू वड्डे (५०) आणि वंजे जुरू पुंगाटी (४७) या दोघी गंभीर जखमी आहेत.
कळपातून भरकटलेल्या या हत्तीने तेलंगणा राज्यात दोन शेतकऱ्यांना ठार करून दोन दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यात प्रवेश केला. २५ एप्रिल रोजी पहाटे या तालुक्यातील कोसफुंडी गावात सर्वप्रथम हत्तीचे दर्शन झाले. त्यानंतर तो कारमपल्ली-टेकला मार्गे कीयर जंगलात गेला. दुपारी ४ वाजताच्या सुमारास कियर येथील शेतशिवारात काम करीत असलेल्या गोंगलू तेलामी नामक शेतकऱ्याला पायाखाली तुडवून ठार केले. त्यानंतर हा हत्ती त्या भागातून पसार होऊन आरेवाडा वरून दोन किलोमिटर वर असलेल्या हिदूर या गावात गेला.
याठिकाणी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास सुरु असलेल्या माता पूजनाच्या कार्यक्रमात त्याने धुडगूस घालून महारी वड्डे, राजे आलामी व वंजे पुंगाटी यांना गंभीर जखमी केले. २५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास तिन्ही महिलांना भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान राजे कोपा हलामी (५०) हिचा रुगणल्यात मृत्यू झाला.
तेलंगाना राज्यात दोन शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या रानटी हत्तीने महाराष्ट्रात प्रवेश करत सिरोंचा वनविभागातील रेपणपल्ली वनपरिक्षेत्रात तब्बल १८ दिवस मुक्काम ठोकून बाहेर पडताच भामरागड तालुक्यात आणखी दोन बळी घेतला. त्यामुळे या रानटी हत्तीच्या हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पाप लोकांची संख्या आता चार वर पोहोचली आहे.
सदर रानटी हत्ती भामरागड वनपरिक्षेत्रातून पुढे छत्तीसगड राज्यातील जंगलात जाण्याची शक्यता आहे. आणखी जीवित हाणी होऊ नये म्हणून वनविभागाच्या वतीने प्रत्येक गावात दवंडी देवुन गावकऱ्यांना घराच्या बाहेर एकटे रात्री-अपरात्री निघण्यास मनाई केली आहे. तसेच जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासन भामरागड यांची मदत घेवून हत्ती दिसल्यास त्याच्याशी छेडखानी न करता तात्काळ वन विभागास माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
बातमीची दखल
आज वनविभागाचे चम्मू हत्तीला पकडण्यासाठी पूर्ण तालुका पिंजून काढत आहेत या वॅन मध्ये बसलेले हे पश्चिम बंगाल वरून आले आहेत त्यांच्याकडे संपूर्ण शस्त्रसाठा उपलब्ध आहे सह्याद्रीचा राखणदार वर बातमी लागताच वनविभाग एकटिंग मोडवर आली आहे.