.
= वडकीत झाले जंगी स्वागत. 
 = कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला मोठा उत्साह.
 प्रती,राळेगाव/खैरी(प्रमोद गवारकर )
यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघासाठी कॉग्रेसच्या"> . = वडकीत झाले जंगी स्वागत. 
 = कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला मोठा उत्साह.
 प्रतीराळेगावखैरी(प्रमोद गवारकर ) यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघासाठी कॉग्रेसच्या"/>
logo

HOME   लक्ष्यवेधी

माणिकराव ठाकरेंच्या स्वागतासाठी आज जमलेली गर्दी अशीच कायम राहतील काय ?

सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा सवाल

माणिकराव ठाकरेंच्या स्वागतासाठी आज जमलेली गर्दी अशीच कायम राहतील काय ? .
= वडकीत झाले जंगी स्वागत. 

 = कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला मोठा उत्साह.
 प्रती,राळेगाव/खैरी(प्रमोद गवारकर )
यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघासाठी कॉग्रेसच्या वतीने माणिकराव ठाकरे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर आज २० मार्च रोजी माणिकराव ठाकरे यांचे प्रथमच दिल्ली वरुन परतांना वडकी येथे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी गेल्या अनेक वर्षांपासून आपशी मतभेदांमुळे दूरावलेली कॉग्रेसचे दोन्ही गटातील नेते मंडळी त्याच्या स्वागतासाठी आज एकत्र आल्याचे पाहून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला होता.मात्र आज स्वागतासाठी जमलेली गर्दी अशीच कायम राहतील काय ?असाही प्रश्न यावेळी सर्व सामान्य कार्यकर्त्याकडून उपस्थित केला जात होता. 

 लोकसभा निवडणुकीचे वारे तालुक्यात जोरात वाहू लागले असून युतीच्या वतीने शिवसेनेची उमेदवारी खासदार भावनाताई गवळी यांना देण्यात आली आहे.यूतीच्या उमेदवार भावना गवळी यांना टक्कर देण्यासाठी कॉग्रेस कडून लोकसभेकरीता माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी काल जाहीर करण्यात आली माणिकराव हे राज्यातील काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांपैकी एक आहेत.केंद्रात व राज्यात माणिकरावांच्या चांगल्या संबधाचा फायदा ते जर निवडून आले तर आपल्या परीसराला नक्की होईल अशी भावना सामान्य कार्यकर्त्यांमध्ये तयार झाली असल्याने त्यांच्या स्वागताकरीता तालुक्यातील कॉग्रेस कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील नेतेमंडळी मोठ्या संख्येने आज वडकी येथे दिसून आले.

तालूक्यात २०१४ च्या निवडणुकीनंतर आज प्रथमच आपसी मतभेदांपोटी कॉग्रेसचे एकमेकांपासून दूरावलेले नेते व कार्यकर्ते एकाच जागी दिसून आल्याने कॉग्रेसला अच्छे दिन येण्याचे चिन्हे सध्या तरी दिसून येत आहे मात्र मागे वळून तालुक्यातील काँग्रेसच्या नेत्यांचा इतिहास बघीतला तर कोणत्याही निवडणुकीमध्ये कॉग्रेसच्या उमेदवाराचा पराभव हा केवळ कॉग्रेसच्याच नेत्यांमुळे झाल्याचे एकंदरीत सामोर आले आहे.त्यामूळे आज वडकी येथे झालेल्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात दिसून आलेली दोन्ही गटातील एकता शेवटपर्यंत टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आता मानिकरावांपूढे उभ ठाकल आहेत.मानिकरावांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज दिल्ली येथून ते यवतमाळला जात असताना तालुक्यातील वडकी सह राळेगाव व तालुक्यात ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी काँग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष वझाहत मिर्झा,मनिष पाटील,किसान काँग्रेसचे देवानंद पवार,माजी आमदार वसंत पुरके, सहकार नेते प्रफुल्ल मानकर, प्रकाश मानकर, किरण कूमरे,अरविंद फुटाणे,अरविंद वाढोणकर, जानराव गिरी, राजू नागतूरे, प्रदीप ठूणे अंकूश मुनेश्वर,अफसर अली सय्यद सभापती प्रविण कोकाटे आदीसह वडकी येथील सागर इंगोले, डॉ नरेंद्र इंगोले,पिंटू गवळी,विनोद माहूरे बबलू शेटे,दिपक महाजन व परिसरातील शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान स्वागत समारंभासाठी आज कॉग्रेसच्या गोटात कधी नव्हे एवढी मोठी गर्दी वडकीत पाहायला मिळाली होती मात्र ही गर्दी अशीच कायम राहतील काय ?असा सवाल यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमधून केला जात होता.


Top