logo

HOME   महिला जगत

'ती' जलराणी!..मुंबईच्या समुद्रात ४८ किलोमीटर पोहली

'ती' जलराणी!..मुंबईच्या समुद्रात ४८ किलोमीटर पोहलीमुंबई : गौरी सिंघवी...वय वर्षे फक्त १४...समुद्राच्या लाटांशीही ती स्पर्धा करतेय...समुद्रावर राज्य करतेय. उदयपूरच्या या जलराणीनं आज, मंगळवारी मुंबईच्या समुद्रालाही मागं सारलं. मुंबईच्या समुद्रात ती तब्बल ४८ किलोमीटर पोहली आणि आपणच या 'दर्याची राणी' असल्याचं सिद्ध केलंय.

मुंबईच्या समुद्रात ४८ किलोमीटर पोहून गौरीनं मंगळवारी स्वतःचाच विक्रम मोडीत काढलाय. 'खारदांडा ते गेट वे ऑफ इंडिया' हे अंतर तिनं पार केलंय. मार्च २०१७ मध्ये तिनं सी-लिंक ते गेट वे ऑफ इंडिया हे ३६ किलोमीटरचं अंतर पार केलं होतं. इंग्लिश खाडी पोहून विक्रमाला गवसणी घालण्याचं स्वप्न आहे, असं गौरीनं सांगितलं.


Top