logo

HOME   मुख्य बातमी

महाराष्ट्रातील गड-किल्ले वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही - खा. डॉ अमोल कोल्हे

महाराष्ट्रातील गड-किल्ले वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही - खा. डॉ अमोल कोल्हेगडचिरोली:- विद्यमान सरकारने महाराष्ट्रातील गड किल्ले भाडेतत्त्वावर देण्याचा जो दुर्दैवी निर्णय घेतला यामुळे फडणवीस सरकार आणखी काय-काय करू शकते याची जाणीव नाही.त्यामुळे महाराष्ट्रातील गड किल्ले वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशी चेतावणी शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी दिली.

          सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या कथित फोडाफोडीच्या व खच्चीकरणाच्या राजकारणाला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्रव्यापी 'शिवस्वराज्य' यात्रेला सुरुवात झाली असून आज तिसऱ्या टप्प्यातील यात्रा गडचिरोली जिल्ह्यात पोहोचली यावेळी ते बोलत होते.
        
             गडचिरोली जिल्हा मुख्यालयातील अभिनव लॉन येथे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी गृहमंत्री जयंत पाटील, शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे,प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी,महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर,माजी मंत्री अनिल देशमुख,माजी मंत्री रमेश भंग,गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विध्यमान बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम,राका चे युवा नेते ऋतुराज हलगेकर, राका चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राकाचे महिला जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे,सेवादल जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापत्रे,युवक जिल्हा अध्यक्ष ऋषिकांत पापडकर,लीलाधर भरडकर,आदी मान्यवर आणि बहुसंख्य जनसमुदाय उपस्थित होती.
        
           डॉ.अमोल कोल्हे यांना मोदी सरकारच्या दुसऱ्या कालखंडाला शंभर दिवस झाले असून याविषयी आणि महाराष्ट्रातील गड किल्ल्यांविषयी मत जाणून घेतांना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.


Related Video


Top