भामरागड : भामरागड तालुका मुख्यालयातील त्रिवेणी संगम परिसरात रमजान ईद (ईद-उल-फितर) मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ईदची नमाज अदा केली.
या पवित्र प्रसंगी देशात सुख, शांती, सामाजिक सलोखा आणि एकात्मता नांदावी यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. नमाजनंतर एकमेकांना गळाभेट देत रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश देण्यात आला.
रमजान महिन्याभरात पोलीस प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल मुस्लिम समाज बांधवांकडून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच ईदच्या दिवशी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सतर्क होते.
दरम्यान, संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.













