• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
November 1, 2026
in Gadchiroli
A A
0
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?
Spread the Information

गडचिरोली: राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी १ नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याचा अचानक दौरा करत विविध विकासकामांची पाहणी केली. विशेष म्हणजे, महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागातील सिरोंचा तालुक्यात त्यांनी प्रत्यक्ष भेटी देत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, त्यांच्या या दौऱ्यात सर्वाधिक लक्ष वेधले ते तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेडीगड्डा बॅरेजच्या पाहणीने.
मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे सिरोंचा येथे दाखल झाले. त्यानंतर सिरोंचा विश्रामगृह, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, फॉसिल पार्क वडदम, मेडीगड्डा बॅरेज, तुमनूर येथील ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र अशा विविध ठिकाणी त्यांनी भेटी देऊन पाहणी केली. यावेळी जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.

RelatedPosts

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

आष्टीच्या अपर तहसीलसाठी डॉ. अशोक नेते सरसावले;वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

मात्र, या दौऱ्यातील मेडीगड्डा बॅरेजची पाहणी आता विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. गोदावरी नदीवरील या प्रकल्पाच्या बॅकवॉटरचा फटका सिरोंचा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बसल्याच्या तक्रारी यापूर्वी समोर आल्या आहेत. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने शेती आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विशेष म्हणजे, सिरोंचा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी मेडीगड्डा प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. मुख्य सचिवांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र या समस्यांवर नेमका काय तोडगा निघणार, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, नुकतेच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तुमडीहेटी सिंचन प्रकल्पासंदर्भात सविस्तर चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर लगेचच महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनी सिरोंचा तालुक्यात हजेरी लावणे आणि मेडीगड्डा बॅरेजची पाहणी करणे यामुळे विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.एकीकडे गोदावरी नदीच्या पाण्याचा लाभ तेलंगणा राज्याला मिळत असताना, दुसरीकडे बॅकवॉटरमुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित होत आहे. अशातच पुन्हा एका सिंचन प्रकल्पाच्या चर्चांना वेग आल्याने भविष्यात या प्रकल्पांचा फटका गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुख्य सचिवांचा हा दौरा केवळ विकासकामांची पाहणी करण्यापुरता मर्यादित होता की, महाराष्ट्र आणि तेलंगणा यांच्यातील सिंचनविषयक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण हालचाली सुरू आहेत? मेडीगड्डा प्रकल्पाच्या पाहणीनंतर शेतकऱ्यांच्या समस्यांवर कोणता निर्णय होणार? या प्रश्नांची उत्तरे आगामी काळातच स्पष्ट होतील.एकंदरीत, मुख्य सचिवांच्या अचानक सिरोंचा दौऱ्याने विकासकामांसोबतच सीमावर्ती भागातील सिंचनाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

Previous Post

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

November 1, 2026
लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

November 1, 2026
आष्टीच्या अपर तहसीलसाठी डॉ. अशोक नेते सरसावले;वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

आष्टीच्या अपर तहसीलसाठी डॉ. अशोक नेते सरसावले;वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

October 30, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1