• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Uncategorized

चंद्रपूरच्या हवाईसेवेसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची दिल्लीत आग्रही मागणी; मोरवा विमानतळाबाबत केंद्रीय मंत्र्यांची सकारात्मक भूमिका

मोरवा विमानतळाचा ‘उडान’ योजनेत समावेश करून चंद्रपूर ते पुणे, मुंबई व दिल्लीसाठी नियमित सेवा सुरू करण्याची मागणी

Ashish Ghume by Ashish Ghume
September 17, 2026
in Uncategorized
Reading Time: 1 min read
A A
0
चंद्रपूरच्या हवाईसेवेसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची दिल्लीत आग्रही मागणी; मोरवा विमानतळाबाबत केंद्रीय मंत्र्यांची सकारात्मक भूमिका
Spread the Information

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांचा सकारात्मक प्रतिसाद; चंद्रपूरच्या हवाई सेवेसाठी लवकरच ठोस निर्णयाचे आश्वासन

RelatedPosts

प्रशासनाने ‘रेग्युलेटरी’ नव्हे तर ‘डेव्हलपमेंट मोड’मध्ये काम करावे; प्रत्येक घरापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणार

अहमदपूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड; 9 आरोपींवर कारवाई, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

मालवाहतूक व दुचाकीची समोरासमोर धडक; दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू

उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि रोजगाराच्या दृष्टीने चंद्रपूरला थेट हवाई जोडणी देण्यासाठी आ.मुनगंटीवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

नवी दिल्ली : चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देण्यासाठी मोरवा विमानतळाचा ‘उडान’ (उडे देश का आम नागरिक) योजनेत समावेश करून चंद्रपूरहून पुणे, मुंबई आणि दिल्लीसाठी नियमित हवाई प्रवासी सेवा सुरू करावी, अशी आग्रही मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मा.ना. किंजरापू राममोहन नायडू यांच्याकडे केली. यावेळी मोरवा विमानतळाच्या विस्तारासह आवश्यक बाबींचा विचार करून चंद्रपूरसाठी नियमित हवाई सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले, त्यामुळे चंद्रपूरच्या हवाई संपर्काच्या मागणीला केंद्राच्या पातळीवर सकारात्मक दिशा मिळाली आहे.

विदर्भातील औद्योगिक, खनिजसंपन्न आणि वनवैभवाने समृद्ध जिल्हा म्हणून चंद्रपूरची स्वतंत्र ओळख आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोळसा व इतर खनिजसंपत्ती असून सिमेंट उद्योग, बल्लारपूर पेपर मिल, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, धारिवाल, जीएमआर,वर्धा पॉवर यांसारखे महत्त्वाचे औद्योगिक व ऊर्जा प्रकल्प कार्यरत आहेत. यासोबतच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर हे देश-विदेशातील पर्यटकांचे महत्त्वाचे आकर्षण ठरले आहे. उद्योग, व्यापार, पर्यटन, शिक्षण आणि प्रशासकीय क्षेत्राचा वाढता विस्तार लक्षात घेता चंद्रपूरला थेट हवाई संपर्काची आवश्यकता असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

सध्या चंद्रपूरहून नियमित विमानसेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी, उद्योजक, व्यावसायिक, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना विमानप्रवासासाठी नागपूर किंवा अन्य शहरांवर अवलंबून राहावे लागते. यामुळे प्रवासासाठी अतिरिक्त वेळ आणि खर्च होतो. चंद्रपूरहून थेट विमानसेवा सुरू झाल्यास नागरिकांची मोठी गैरसोय दूर होण्यासोबतच जिल्ह्यातील उद्योग, व्यापार, पर्यटन, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळू शकते.

चंद्रपूर शहरापासून सुमारे ९ किलोमीटर अंतरावर असलेला मोरवा विमानतळ या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकतो. सुमारे ६२ एकर क्षेत्रात असलेल्या या विमानतळाची धावपट्टी सध्या सुमारे १ किलोमीटर असून आवश्यक तांत्रिक निकषांनुसार तिचा विस्तार केल्यास नियमित प्रवासी विमानसेवा सुरू करण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. विमानतळाच्या दक्षिण-पूर्व – पश्चिम दिशेला वनविभागाची जमीन असून उत्तर दिशेला खासगी जमीन असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मोरवा विमानतळाच्या संदर्भात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील उंच बॉयलर्समुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींचाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर पुनर्विचार करावा, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली. आजच्या अत्याधुनिक विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा विचार करता या बाबींचा तांत्रिक अभ्यास करून व्यवहार्य मार्ग काढण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोरवा विमानतळाचा ‘उडान’ योजनेत समावेश झाल्यास चंद्रपूरला प्रादेशिक हवाई संपर्काच्या माध्यमातून देशातील प्रमुख शहरांशी जोडण्यास मदत होऊ शकते. विशेषतः चंद्रपूर-पुणे, चंद्रपूर-मुंबई आणि चंद्रपूर-दिल्ली या मार्गांवर नियमित सेवा सुरू करण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. या हवाई जोडणीमुळे चंद्रपूरच्या उद्योगांना बाजारपेठांशी संपर्क, विद्यार्थ्यांना शैक्षणिक केंद्रांशी जोडणी आणि ताडोबा पर्यटनाला देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी अधिक सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होऊ शकते.

मोरवा विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वीही सातत्याने पाठपुरावा केला आहे. १५ ऑक्टोबर २०२५, १५ डिसेंबर २०२५ आणि २७ मार्च २०२६ रोजी त्यांच्या कार्यालयामार्फत या विषयावर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला होता. आता पुन्हा केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांची आ.मुनगंटीवार यांनी नवी दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन सादर केले.

आ. मुनगंटीवार यांच्या आग्रही मागणीची केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक दखल घेत मोरवा विमानतळाबाबत आवश्यक कार्यवाही करून चंद्रपूरसाठी नियमित हवाई सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या दीर्घकाळापासूनच्या हवाईसेवेच्या मागणीला केंद्राच्या पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, मोरवा विमानतळाच्या माध्यमातून चंद्रपूरला पुणे, मुंबई आणि दिल्लीशी जोडण्याच्या प्रयत्नांना आता अधिक बळ मिळाले आहे.

Previous Post

योगशिक्षकाच्या वाढदिवशी विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Next Post

राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1