समुद्रपूर : यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा संचालित यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मांडगाव आणि अस्तित्व बहुउद्देशीय सामाजिक संस्था, बोथुडा यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. बापूरावजी देशमुख व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. उद्घाटन सुनिल डुकरे यांच्या हस्ते झाले, तर प्रास्ताविक राजेश बाळसराफ यांनी केले. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाची रंगत वाढवली.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार एसएससी परीक्षेत कु. रोहित डवरे (81.40%),कु. भाग्यश्री भारसाकडे (84.20%),कु. संजीवनी चांभारे (74.20%)एचएससी परीक्षेत कु. राणी गुळघाणे (69%),कु. संकेत बरडे (74%),कु. रागिणी काकडे (64%) या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, मेडल व मोमेंटो देऊन सन्मान करण्यात आला.
प्रमुख अतिथी सुनिल डुकरे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी भविष्यासाठी प्रेरणा दिली, तर रोशन नवघरे यांनी समाजाप्रती असलेल्या जबाबदारीवर भाष्य केले.
यावेळी निबंध, वक्तृत्व, क्रिकेट, संगीत खुर्ची, लंगडी, प्रश्नमंजुषा, नाटिका व नृत्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. नेहरू युवा केंद्र, वर्धा यांच्या वतीने भाषण स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना मोमेंटो देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमात मुख्याध्यापक नितीन लोहकरे, अस्तित्व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रोशन नवघरे, प्रमोद कुडमते, सुरज शेंडे, गजानन मस्के, संजय गलाडे, कामडी , शेंडे आणि बावणे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन मुते यांनी केले, तर आभार प्रदर्शन पंकज दांडेकर यांनी केले. विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.













