सेलू: घरकुल व सिंचन विहिरीचे लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या निधीचे तीन महिने झाले तरी अनुदान मिळाले नसल्याने घरकुलाचे व सिंचन विहिरीचे लाभार्थी ग्राम पंचायत व पंचायत समितीच्या पायऱ्या झिजवित आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतात सिंचन विहिरीचे काम पूर्ण केले तर मोदी आवस योजनेतून घरकुलाचे बांधकाम काहींचे पूर्ण झाले तर काही लाभार्थ्यांचे निधी अभावी काम रखडले आहे या मुळे दोन्ही योजनेत कारागीर, रजाकाम करणाऱ्यांची मजुरीचे पैसे लभर्थ्याकडे असल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडला आहे त्यामुळे आज ना उद्या शासनाचे पैसे येईल अशी आशा असताना लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागली तेव्हापासून तर आज पर्यंत या कामाचा निधी संबंधित विभागाला प्राप्त झाला नसल्याने ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले नाही या मुळे अनेकांची घराची होणारी पूर्ण कामे रखडली आहे तरी शासनाने हा निधी त्वरित वितरित करावा यासाठी पंचायत समितीच्या या विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे लाभार्थी चकरा मारताना दिसत आहे