सेलू: – सलग सहा दिवसांपासून पाऊस सुरू असून जन जीवन विस्कळीत झाले आहे तर बाजार पेठेत शुकशुकाट दिसत असल्याने दैंनदिन व्यवहाराचे आर्थिक चक्र थांबल्या चे चित्र पाहायला मिळत आहे.
सलग सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाला फटका बसला असून शेतातील धुरे बंधारे फुटल्याने शेतकऱ्याला पावसात शेतातील बांध बंदिस्त करण्याची वेळ आली त्यातच पिकाचा विमा काढण्यासाठी धावपळ करावी लागत आहे अश्यातच ग्रामीण भागातील व शहरातील व्यावसायिकांना ग्राहकाची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील कृषी , किराणा, कापड, व्यावसायिकांच्या दुकानात शुकशुकाट दिसून येत आहे .गत सहा दिवसापासून पावसाने उसंत दिली नसल्याने शेत मजुरांच्या हाताला काम नाही त्या मुळे ग्रामीण भागातील अर्थ चक्रे थांबली आहे .
पावसाने उसंत दिली नसली तरी आपले सेवा केंद्र , पीक विमा कंपनी चे कार्यालय, ग्राम पंचायत, तहसील कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे