वर्धा (संजीव वाघ) : सालोड हिरापूर येथे आमदार दत्तक ग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावात प्रथमच डॉ. हॅनिमन भवनच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. होमिओपॅथी क्षेत्राच्या विकासासाठी वर्धा शाखेच्या एच.एम.ए.आय द्वारे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात आहे. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने या भवनासाठी हजार चौरस फूट बांधकामाची मंजुरी मिळाली आहे, ज्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून हे भवन उभे राहणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्यात डॉ. पंकज भोयर, डॉ.अभुदय मेघे, डॉ.विलास डांगरे, डॉ. मुरलीधर इंगळे, डॉ.दिलीप खांदोडे, डॉ. अरविंद कोटे, डॉ. राजन कायपांडे, डॉ.संजय तांबे, डॉ. न्यानेश्वर ढाकुरकर, डॉ.भानुदास दाभेरे, धनंजय धार्मिक, डॉ. नारायण निकम, डॉ. सचिन पावडे, मुरलीधर बेलखोडे यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
ग्रामपंचायतचे सरपंच अमोल कन्नाके आणि उपसरपंच आशिष कुचेवार यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाला मोठा पाठिंबा मिळाला आहे. आमदार डॉ.पंकज भोयर, यांनी ग्रामपंचायतीच्या विकास कार्याचे विशेष कौतुक केले आणि या आरोग्य केंद्रामुळे गरीब आणि गरजू लोकांना मोफत उपचार मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे आयोजक अध्यक्ष डॉ. दत्ता कुंभारे, उपाध्यक्ष डॉ. अनिल लोणारे, उपाध्यक्ष डॉ.सुनीता कुर्वे, सचिव डॉ. रवी देशमुख, सहसचिव मिलिंद वासेकर, सहसचिव डॉ. आनंद गाढावकर, कोषाध्यक्ष डॉ. प्रशांत खातदेव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन शुभांगी निमकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुचित्रा कुर्वे यांनी केले.