वरोरा :- तालुक्यातील टेमुर्डा येथे १७ जुलैला शरद गुघाणे यांच्या चहाच्या दुकानात चोरीची घटना घडली . या घटनेची तक्रार वरोरा पोलीस स्टेशनला प्राप्त होताच वरोरा पोलीस स्टेशनचे डी बी पथकाने स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस स्टेशन कोरपना याच्या मदतीने सहा आरोपीना ताब्यात घेत त्यांच्याकडून ६ लाख ८५ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे .
प्रदीप संजय शेरकुरे , आकाश नारायण शेरकुरे , चिंतामण संजय शेरकुरे , दोन महिला , सर्व राहणार पारधी गुडा, धोपटाळा , तालुका कोरपना व विकास काळे रा .चिनोरा पारधी गुडा ता वरोरा असे आरोपींचे नाव आहे.
वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथे शरद सीताराम गुघाने यांचे चहाचे दुकान आहे .१७ जुलैला ते दुकानाचे शटर उघडकारून झोपले असतांना अज्ञात आरोपींनी त्यासारख्या चहाच्या दुकानातील २६९ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे ६ लाख ७२ हजार ५०० ,१ लाख रुपये नगदी , ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ७ लाख ८० हजार ५०० रुपयाचा माल चोरून नेला. याबाबत गुघाने यांनी १९ जुलैला वरोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली त्यांच्या तक्रारी वरून कलम ३०५ भारतीय न्याय संहिता प्रमाणे तक्रार दाखल करून वरोरा पोलिसांनी तपासास सुरवात केली व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व कोरपना पोलिसांच्या यांच्या मदतीने चोवीस तासात आरोपीना अटक करून मुद्देमाल जप्त केला . अटक केलेल्या आरोपींकडून ८ सोन्याच्या अंगठ्या , ४ सोन्याच्या बांगड्या , १ सोन्याची चपला कंठी , १ जोड सोन्याचे कानातले , २ सोन्याची पोत , एक सोन्याचा गोफ असे एकूण सोने, २ मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली शिवरलेट स्पार्क कार क्रमांक एम एच ३४ ए ए ३३२४ तसेच गुन्ह्यात वपुरलेली ऍक्टिवा क्रमांक एम एच ३१ ई व्ही ९१८८ असा एकूण ६ लाख ८५ हजाराचह मुद्देमाल जप्त करण्यात आला . तसेच फरार आरोपींना अटक करून गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमाल जप्त करणे बाकी आहे .
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शनअप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू , सहायक पोलीस अधीक्षक वरोरा नयोमी साटम, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार , वरोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे , यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे , स्थानिक गुन्हा शाखा चंद्रपूर चे सहायक पोलीस निरीक्षक मनोज गदादे, कोरपना पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड तसेच वरोरा पोलीस स्टेशन येथील डी बी पथकातील पोलीस हेड कान्स्टेबल दीपक दुधे , संदीप मुळे, विशाल राजूरकर , महेश गावतुरे , मोहन निषाद , राजू लोधी यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन कोरपना येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने केली .
आरोपी न्यायालयीन कोठडीत रवाना
सदर आरोपींना १९ तारखेला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते . न्यायालयाने १९ जुलै ते २४ जुलै पर्यंत आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते . २४ जुलैला त्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले .