अहिल्यानगर :राज्यातील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ५ डिसेंबरला मुंबई येथील आझाद मैदानावर नवीन सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आयोजित केला आहे.
या सोहळ्यासाठी भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांना सरकारने विशेष निमंत्रण दिले आहे. भगवानगडाच्या दृष्टीने ही भूषणाव बाब असून भगवानगडाचा सन्मान सरकारने केला आहे. यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक या ठिकाणी काळा राम मंदिरात आले होते. त्यावेळीही भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांना निमंत्रण दिले गेले होते. त्याप्रसंगी नरेंद्र मोदी व डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घडून आली होती.