जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन 1098 व पोलीस स्टेशन गडचिरोली यांची संयुक्त कार्यवाही
गडचिरोली : आज रोजी गडचिरोली जिल्ह्यापासून पासून अगदी 2 किमी अंतरावरील सेमाना देवस्थान या ठिकाणी दुपारी 01 वाजता बालविवाह होणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली. लगेच जिल्हा बाल संरक्षण टीम गडचिरोली व चाईल्ड लाईन टीम यांनी सदर बालविवाह रोखण्याकरीता बालकाचे गाव गाठले व बालकाचा जन्म पुरावा तपासणी करून बालक 18 वर्षाखालील असल्याची खात्री केली.
लगेच जिल्हा बाल संरक्षण टीम यांनी बलिकेचे घरी विसापूर गाठले व चौकशीअंती तिथे कसलीच हालचाल दिसून आली नाही नंतर मुलाचे घरी गोकुलनागर येथे चौकशी केली असता तिथे सुद्धा काहीच हालचाल दिसून आली नाही. त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण टीमने नियोजन करून चौकशी केली असता सेमाना देवस्थान येथे लग्न होत असल्याची खात्री करून ,सर्व माहितीची शहानिशा झाल्यानंतर पोलीस स्टेशन गडचिरोली येथील पूनम गोरे साहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे उपस्थितीत वर पक्ष व वधू पक्ष यांना एकत्र बसऊन बालविवाह बाबतचे दुष्परिणाम व कायदा नुसार होणारी कार्यवाही याबाबत उपस्थित सर्वांना माहिती देण्यात आली. वर पक्ष हे राहणार गडचिरोली येथील असून त्यांना विवाह न करता रिकामे हाथ जाण्याची वेळ जिल्हा बाल सरंक्षण कक्षाने मुलाकडील मंडळींवर आणली व मुलीचे वय 18 वर्ष असल्याची खात्री केल्याशिवाय लग्नात मंडप टाकनायचे काम घ्यायचे नाही अशी मंडप डेकोरेशनचे मालकास तंबी देण्यात आली.
मुलीच्या आईकडून मुलीचे 18 वर्ष होइपर्यंत बालिकेचे विवाह करणार नाही असे हमी पत्र लिहून घेतले व बालिकेचे समुपदेशन करण्यात आले .
सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुरे, दिनेश बोरकुटे जिल्हा समन्वक चाईल्ड लाईन, सामाजिक कार्यकर्ता जयंत जथाडे , तनोज ढवगये, बाल संरक्षण अधिकारी प्रियंका आसुटकर, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार, निलेश देशमुख, मनीषा पुप्पालवर, उज्ज्वला नाकाडे, पूजा धमाले, चाईल्ड लाइन टीम मेंबर तृप्ती पाल,वैशाली दुर्गे,अविनाश राऊत , पोलिस स्टेशन गडचिरोली येथील सहायक पोलिस निरीक्षक पूनम गोरे यांनी विशेष सहकार्य केले.
सदर विवाह स्थळी जाऊन 16 वर्ष 9 महिने वय असणाऱ्या बालिकेचा बालविवाह थांबवण्यात जिल्हा बाल संरक्षण टीम, पोलीस विभाग, चाईल्ड लाईन गडचिरोली यांना यश आले. अशाप्रकारे जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे व चाइल्ड लाईन टोल फ्री क्रमांक 1098 यावर बाल विवाह बाबत संपर्क करावे असे असे आव्हान संबंधित विभागाकडून करण्यात आले आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.