राजुरा (चंद्रपूर ) :-– देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसंदेत महामहिम राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावर उत्तर देताना कोरोना वरुन खालच्या पातळीचे राजकारण करीत महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान करणारे विधाने केलीत. केंद्र सरकारच्या अपयशाचे खापर महाराष्ट्रावर फोडले. त्यांच्या या पुर्वग्रहदुषित वक्तव्याचा राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्नाखाली तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांच्या नेतृत्वात संविधान चौक राजुरा येथे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. गोंडपिपरी येथे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कोरपना येथे विठ्ठलराव थिपे आणि जिवती येथे गणपत आडे यांच्या नेतृत्वात जाहीर निषेध करण्यात आला.
या प्रसंगी राजुरा येथे जि प सदस्य मेघाताई नलगे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा कविता उपरे, उपसभापती मंगेश गुरणुले, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्णेवार, माजी नगरसेवक हरजितसिंग संधू, गजानन भटारकर, पं स सदस्य कुंदा जेणेकर, तुकाराम मानुसमारे, आत्माचे अध्यक्ष तिरुपती इंदुरवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवर, महिला शहराध्यक्षा संध्या चांदेकर, जिवती महिलाध्यक्षा नंदाताई मुसने, शिवाजी श्रिरामे, विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, शहराध्यक्ष अशोक राव, युवक काँग्रेसचे महासचिव शंतनू धोटे, काँग्रेसचे अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष सय्यद सकावत अली, अविनाश जेनेकर, मतीन कुरेशी, उमेश गोरे, अॅड चंद्रशेखर चांदेकर, हरिचंद्र जूनघरे, शिवराम लांडे, रामभाऊ ढुमने, विकास देवाळकर, लहू चहारे, जावेद अब्दुल, सय्यद साबीर, इर्शाद शेख, निर्मला कुडमेथे, पुनम गिरसावळे, योगिता मटाले यासह राजुरा गोंडपिपरी, कोरपना आणि जिवती येथे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.