गडचिरोली (वैरागड): मानापुर येथील जेष्ठ नागरिक रामभाऊ हस्तक महाराज हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती बलराम सोमनानी यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी 15 ऑगस्ट 2024 रोजी हस्तक महाराज यांच्या घरी जाऊन सपत्नीक भेट दिली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या भेटीदरम्यान माजी पंचायत समिती सभापती बघूजी ताडाम, आदिवासी विविध सहकारी संस्था देलनवाडीचे व्यवस्थापक दिलीप कुमरे, शीतल सोमनानी, राहुल धाईत, तुकाराम वैरकार, वामन लाखनकर, पंकज किरंगे, भजनराव लाखनकर, गजेंद्र डोंमळे आणि रामदास डोंगरवार उपस्थित होते.