चंद्रपूर-राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या करंजी येथिल ८ गावांचे प्रतिनीधित्व करणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली.प्रतिष्ठेच्या लढतीत कमलेश निमगडे गटाच्या “जनमत” पॕनलचा पगडा भारी ठरला असून त्यांनी गड जिंकला आहे.रोमहर्षक लढतीत संस्थेच्या अध्यक्षपदी धानापूर येथिल अंबादास शेडमाके तर उपाध्यक्षपदी करंजीतील अनिल आत्राम यांची बहूमताने निवड झाली आहे.
१३ संचालक असलेल्या तालुक्यातील करंजी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड बुधवारी (दि.०९) संस्थेच्या कार्यालयात पार पडली.अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी पार पडलेल्या या निवडीदरम्यान दोनही पदासाठी प्रत्येकी दोन अर्ज आले.अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या या निवडीदरम्यान अध्यक्षपदासाठी टाकलेला उमेदवारी अर्ज गजानन सोयाम यांनी ऐनवेळी मागे घेतला.यामूळे “जनमत” पॕनलच्या अध्यक्षपदाचे उमेदवार अंबादास शेडमाके अविरोध निवडून आले.मात्र उपाध्यक्ष पदासाठी दोन अर्ज कायम राहिले.यामूळे उपाध्यक्ष पदासाठी मतदान झाले.यावेळी जनमत पॕनलच्या उपाध्यक्षपदाचे उमेदवार अनिल आत्राम यांना ७ तर हरिचंद्र चाफले यांना ६ मते पडली.अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या या निवडीत जनमत पॕनलच्या अनिल आत्राम यांची उपाध्यक्षपदी बहूमताने निवड झाली.प्रतिष्ठेच्या या लढतीत अंबादास शेडमाके यांची अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी अनिल आत्राम बहूमताने विजयी झाले.अशी घोषणा संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेतील अध्यासी अधिकारी आर.व्ही.सराफ यांनी केली.अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या नावाची नावाची घोषना होताच जनमत पॕनलच्या समर्थकांनी एकच जल्लोश केला.यानंतर नवनियुक्त पदाधिकारी अंबादास शेडमाके,अनिल आत्राम यांचेसह जनमत पॕनलच्या नवनियूक्त संचालकांचा सत्कार करण्यात आला.चूरशिच्या लढतीतील या विजयात जनमत पॕनलचे मार्गदर्शक,काॕग्रेसचे जिल्हा सचिव कमलेश निमगडे,सहकार नेते संजय वडस्कर,अशोक चिचघरे,बळवंत पिपरे,सारनाथ बक्षी,सुरेश श्रिवास्कर,गंगाधर तेल्कापल्लीवार,श्रिनिवास तेल्कापल्लीवार,मधूकर तेल्कापल्लीवार,पंकज कोरडे,नितिन रायपूरे,निखिल बामणे,नितेश भोयर आदिंनी परिश्रम घेतले आणि अभिनंदनही केले.