गडचिरोली:- राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नागपूर विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नागपूर विभागीय अध्यक्ष सौ शाहीन हकीम यांनी मंगळवारी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरेगाव येथे आयोजित बैठकीत पक्षाचा आढावा घेतल्या. यावेळी त्यांनी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा केले.
शाहीन हकीम म्हणाल्या की,लवकरच आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. त्या दृष्टीने तयारी करून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपालिका, बाजार समिती व इतर सहकारी संस्थांवर जास्तीत जास्त उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवडून येण्यासाठी नियोजन करा. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविले जात नसतील तर,नागरिकांच्या हितासाठी प्रसंगी आंदोलन उभे करून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय देण्यात यावा, असे आवाहन त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले.
एवढेच नव्हेतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार शेवटच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करा,सभासद नोंदणी व बूथ कमिटीवर भर द्या असेही त्यांनी आवाहन केले.यावेळी महिला तालुकाध्यक्ष महिला सुशीला हालमारे, शहर महिला अध्यक्ष मनीषा पिंपळकर, नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष चित्रलेखा मिश्रा,नगरसेविका दीक्षा सहारे, नंदा गव्हाणे,ललिता संग्रामे,माधुरी पिंपळकर,हर्षा राउत,आम्रपाली डोंगरकर, यासमीन पठाण, निशा मस्के, पुष्पाताई डोंगरकर,कविता ठवरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्जुनी मोरगाव महिला पदाधिकारी उपस्थित होते.