वरोरा : येथील विवीध ठिकाणी थंडीत कुडकुडत असणाऱ्या २० निराधार व्यक्तींना धीरज मित्रपरिवार व्हॉट्सॲप ग्रुपच्या वतीने ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
गेल्या तीन वर्षांपासून वरोरा शहरात ब्लॅंकेटचे वाटप करण्यात येते, असे ग्रुपचे अडमिन तथा सामाजिक कार्यकर्ते धीरज लाकडे यांनी सांगितले.शहरातली गांधी चौक, जुनी नगरपरिषद, शहिद योगेश डाहूल चौक, सरकारी दवाखाना, रेल्वे स्टेशन, लोकमान्य शाळा, बस स्थानक मोहबाळा रोड, सब्जी मार्केट आदी ठिकाणी थंडीमध्ये कुडकुडत असणाऱ्या निराधारांना ब्लॅंकेट दिले. यावेळी धिरज लाकडे , प्रशांत बदकी , तुलसीदास अलाम, निखिल कोरटकर,सारंग सलाम, बापूभाऊ आडे, वेदांत परचाके आदी उपस्थित होते.