मुंबई (वृत्तसंस्था):- गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्यावर आज संध्याकाळी 6: 30 वाजता मुंबईतील शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार होणार आहे.
दरम्यान, लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येणार आहेत.
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर लगेच पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली होती. त्यांनतर आता मोदी संध्याकाळी 4:30 पर्यंत मुंबईत दाखल होतील आणि लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहतील.
I am anguished beyond words. The kind and caring Lata Didi has left us. She leaves a void in our nation that cannot be filled. The coming generations will remember her as a stalwart of Indian culture, whose melodious voice had an unparalleled ability to mesmerise people. pic.twitter.com/MTQ6TK1mSO
— Narendra Modi (@narendramodi) February 6, 2022
मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. दयाळू आणि काळजीवाहू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. लता दीदींकडून मला नेहमीच अपार स्नेह मिळाला हा मी माझा सन्मान समजतो. माझा त्यांच्याशी झालेला संवाद अविस्मरणीय राहील. त्यांनी आपल्या देशात एक पोकळी सोडली आहे जी भरली जाऊ शकत नाही. येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीतील एक दिग्गज म्हणून स्मरण ठेवतील, असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले होते.