• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

मशालची साथ, आता मातोश्रीचा हात; आशिष रणदिवे ठाकरे गटात

 भाजप कामगार आघाडीच्या महामंत्रीपदानंतर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश; चुकीच्या बातम्यांमधून संभ्रम पसरविल्याचा रणदिवेंचा आरोप

Ashish Ghume by Ashish Ghume
August 8, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
मशालची साथ, आता मातोश्रीचा हात; आशिष रणदिवे ठाकरे गटात
Spread the Information

चंद्रपूर | प्रतिनिधी

RelatedPosts

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष उपस्थितीत मूल शहरात स्वातंत्र्यदिनी सायंकाळी ४ वाजता भव्य तिरंगा यात्रा

चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली असून, भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे महामंत्री म्हणून कार्यरत असलेले आशिष रणदिवे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मुंबई येथील ‘मातोश्री’वर ७ ऑगस्ट रोजी पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रणदिवे यांचा पक्षप्रवेश झाला. या प्रवेशामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता नवे वळण मिळाले आहे.

यावेळी शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, प्रशांत कदम यांच्यासह चंद्रपूर जिल्हाप्रमुख भास्कर ताजने, उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड, संपर्कप्रमुख दिलीप कदम, विधानसभा प्रमुख बंडू डाखरे, भद्रावती तालुकाप्रमुख नरेश काळे, तालुका संघटक सचिन डुकरे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, चिमूर तालुकाप्रमुख वैभव ठाकरे, ब्रह्मपुरी तालुकाप्रमुख नरेंद्र गाडगीलवार, ब्रह्मपुरी शहरप्रमुख भूषण रामटेके, माजी उपजिल्हाप्रमुख मिलिंद भन्नारे, युवासेना शहरप्रमुख सुरेश ठवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आशिष रणदिवे यांनी सांगितले की, नगरपरिषद निवडणुकीपूर्वी ते भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे महामंत्री म्हणून कार्यरत होते. या काळात भाजपच्या विविध संघटनात्मक उपक्रमांमध्ये तसेच निवडणुकीच्या कामात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कामगारांना संघटित करण्यासाठीही आपण सातत्याने काम केल्याचे रणदिवे यांनी स्पष्ट केले.

मात्र नगरपरिषद निवडणुकीच्या काळात आपल्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाल्याने ऐनवेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा एबी फॉर्म स्वीकारून मशाल चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. नगरपरिषद निवडणुकीत ‘मशाल चिन्हावर निवडणूक लढविल्याची बाब रणदिवे यांनी स्पष्टपणे मान्य केली आहे. मात्र त्या वेळी आपला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अधिकृत प्रवेश झालेला नव्हता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.निवडणुकीतील राजकीय निर्णय आणि पक्षातील अधिकृत प्रवेश या दोन वेगळ्या बाबी असून, त्यावेळची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन आपण निवडणूक लढविल्याचे रणदिवे यांनी सांगितले.

मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश

७ ऑगस्ट रोजी मुंबई येथील ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आशिष रणदिवे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश झाला. पक्षाच्या अधिकृत सामाजिक माध्यमांवरूनही त्यांच्या पक्षप्रवेशाची माहिती प्रसारित करण्यात आली.

या प्रवेशामुळे आपल्या राजकीय भूमिकेबाबत आता कोणताही संभ्रम नसल्याचे रणदिवे यांनी स्पष्ट केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवून आपण शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला असून, आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चुकीच्या बातम्यांमधून संभ्रम पसरविल्याचा आरोप

आपल्या पक्षप्रवेशाची अधिकृत माहिती पक्षाच्या सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाल्यानंतर काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांकडून आपल्याबाबत चुकीची माहिती माध्यमांना दिली जात असल्याचा आरोप रणदिवे यांनी केला आहे.

माझ्या पक्षप्रवेशाची अधिकृत माहिती पक्षाच्या सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाल्यानंतर काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांकडून माझ्याबाबत चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सत्यता पडताळून न पाहता काही माध्यमांमध्ये माझ्याबाबत बातम्या प्रसिद्ध करून माझी बदनामी करण्याचा आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप रणदिवे यांनी केला.

Previous Post

रस्ते-पुलांसाठी माडिया आदिवासींचा न्यायालयीन लढा; भामरागडच्या दुर्गम गावांचा प्रश्न थेट उच्च न्यायालयात

Next Post

खड्ड्यांचे साम्राज्य, पुलाला पडले भगदाड; ‘त्या’ रस्त्यावर जीवघेणा प्रवास कधी थांबणार?

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
खड्ड्यांचे साम्राज्य, पुलाला पडले भगदाड; ‘त्या’ रस्त्यावर जीवघेणा प्रवास कधी थांबणार?

खड्ड्यांचे साम्राज्य, पुलाला पडले भगदाड; ‘त्या’ रस्त्यावर जीवघेणा प्रवास कधी थांबणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

September 1, 2026
गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

August 31, 2026
बंदुका सोडल्या, नव्या आयुष्याची वाट धरली! 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची सुरक्षित घरवापसी

बंदुका सोडल्या, नव्या आयुष्याची वाट धरली! 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची सुरक्षित घरवापसी

August 31, 2026
आलापल्लीत खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांना त्रास; बसस्थानकासमोर आदिवासी विद्यार्थी एकता मंचाचे ठिय्या आंदोलन

आलापल्लीत खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांना त्रास; बसस्थानकासमोर आदिवासी विद्यार्थी एकता मंचाचे ठिय्या आंदोलन

August 31, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1