• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
September 1, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड
Spread the Information

अहेरी : दुर्गम, ग्रामीण आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि संधी मिळाल्यास तेही वैद्यकीय क्षेत्रात मोठी भरारी घेऊ शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी आणि ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ (LFU), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा प्रशिक्षण उपक्रमाला यश मिळाले असून, ‘उलगुलान’ उपक्रमातील तब्बल सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.

RelatedPosts

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

बंदुका सोडल्या, नव्या आयुष्याची वाट धरली! 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची सुरक्षित घरवापसी

आलापल्लीत खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांना त्रास; बसस्थानकासमोर आदिवासी विद्यार्थी एकता मंचाचे ठिय्या आंदोलन

दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मनात डॉक्टर होण्याचे स्वप्न रुजवून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.गडचिरोलीच्या आदिवासी पट्ट्यातून सात विद्यार्थी आता वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करणार असल्याने या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, खमणचेरू येथे वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी २० दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत तब्बल २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेचे मार्गदर्शन न देता शैक्षणिक गुणवत्ता, व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास, वेळेचे नियोजन आणि स्पर्धात्मक परीक्षेची तयारी याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांच्या विविध चाचण्या आणि मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून १५ गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ संस्थेच्या माध्यमातून ‘उलगुलान’ पुणे तुकडीत दोन वर्षांचे विशेष निवासी प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षणाची फलश्रुती आता समोर आली असून, निशांत मल्लेश सिडाम (अहेरी), साहिल टेकाम (गुंडेरा, ता. अहेरी), जीवन मोतीराम सिडाम (दामपूर, ता. मुलचेरा), अरमान होमेश्वर आत्राम (चपराळा, ता. चामोर्शी), काव्या खुशाल कुसनाके (धनूर, ता. मुलचेरा), चंदना रवींद्र उईके (मिचगाव, ता. धानोरा) आणि श्रुती लालसू वड्डे (मलमपोडूर, ता. भामरागड) या सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.

एकलव्य शाळेच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

विशेष म्हणजे, या सात विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थ्यांनी एकलव्य निवासी विद्यालय, अहेरी येथे इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. एका विद्यार्थिनीचे शिक्षण आलापल्ली येथील ग्लोबल शाळेत झाले आहे. तर दोन विद्यार्थिनींनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड आणि गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या विविध आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेतले आहे.दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत योग्य दिशा, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा मिळाल्यास तेही मोठी स्वप्ने पाहू शकतात आणि ती प्रत्यक्षात साकार करू शकतात, याचे सात विद्यार्थ्यांचे हे यश प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील तीनही प्रकल्पातील विद्यार्थ्यांसाठी खमणचेरू येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.सदर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी (तत्कालीन) सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस. डी. वसावे आणि एस. पी. डोंगरे यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी धनराज डबले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हा उपक्रम पुढेही सुरू ठेवणार

दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना योग्य व्यासपीठ व मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. ‘उलगुलान’ उपक्रमातून सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी झालेली निवड ही अभिमानाची बाब आहे. भविष्यातही हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवून अधिकाधिक आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येईल.
-अमर राऊत, प्रकल्प अधिकारी, अहेरी

Previous Post

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

September 1, 2026
गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

August 31, 2026
बंदुका सोडल्या, नव्या आयुष्याची वाट धरली! 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची सुरक्षित घरवापसी

बंदुका सोडल्या, नव्या आयुष्याची वाट धरली! 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची सुरक्षित घरवापसी

August 31, 2026
आलापल्लीत खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांना त्रास; बसस्थानकासमोर आदिवासी विद्यार्थी एकता मंचाचे ठिय्या आंदोलन

आलापल्लीत खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांना त्रास; बसस्थानकासमोर आदिवासी विद्यार्थी एकता मंचाचे ठिय्या आंदोलन

August 31, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1