मूल प्रतिनिधी : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार Sudhir Mungantiwar यांच्या वाढदिवसानिमित्त मूल शहरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्ष, भाजपा युवा मोर्चा, भाजपा महिला मोर्चा, विविध आघाड्या व सेल यांच्या संयुक्त विद्यमाने दिवसभर विविध कार्यक्रम पार पडणार असून नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६ वाजता युवा मॅरेथॉनने होणार असून त्यानंतर सकाळी ६.१५ वाजता महिला मॅरेथॉन आणि ६.३० वाजता युवती मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ८ वाजता सिद्धिविनायक मंदिर येथे भजन व महाआरती होईल.
यानंतर सकाळी १० वाजता विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता रामलीला सभागृहात आधार काठी वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रक्तदान शिबिर तसेच रक्तदाब व रक्तशर्करा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी ४ वाजता महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार असून सायंकाळी ५ वाजता ‘विकासाची ज्योत’ रॅली काढण्यात येईल. सायंकाळी ६.३० वाजता माता कन्यका मंदिर येथे महाआरतीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
समाजसेवा, आरोग्य जनजागृती, शिक्षणाला प्रोत्साहन आणि सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच मूल शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.













