• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

भामरागड तालुक्यात अतिवृष्टीदरम्यान धाडसी बचावकार्य; एकाच कुटुंबातील तिघांचे प्राण वाचले

govind chakravarti by govind chakravarti
July 29, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
भामरागड तालुक्यात अतिवृष्टीदरम्यान धाडसी बचावकार्य; एकाच कुटुंबातील तिघांचे प्राण वाचले

Oplus_16908288

Spread the Information

गडचिरोली/भामरागड:- भामरागड तालुक्यात बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन जण नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडले होते. परिस्थिती अत्यंत गंभीर बनल्याने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाने तातडीने एसडीआरएफच्या मदतीने बचाव मोहीम राबवत तिन्ही जणांना सुखरूप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले. बचाव करण्यात आलेल्यांमध्ये नवी केये कुडयामी (वय 40), अर्चना केये कुडयामी (वय 16) आणि अक्षरा केये कुडयामी (वय 3), सर्व रा. लाहेरी, ता. भामरागड यांचा समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तिघे बुधवारी सकाळी शेतातील कामासाठी गावाबाहेर गेले होते. दरम्यान, सकाळपासूनच भामरागड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू होता. दुपारनंतर पमुलगौतम नदी व परिसरातील नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली. सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास नदीला मोठा पूर आला. त्याचवेळी लाहेरी येथील नालाही दुथडी भरून वाहू लागल्याने संबंधित तिघे नदी आणि नाल्याच्या मधील भागात अडकून पडले.सतत कोसळणारा पाऊस आणि वाढते पाणी यामुळे चारही बाजूंनी त्यांना पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान असल्याने नदी अथवा नाला पार करणे अशक्य झाले होते. परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याने ते पुराच्या पाण्यात वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला होता.सायंकाळी सुमारे 6.30 वाजता गावकऱ्यांनी भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांच्याशी संपर्क साधून तातडीने मदतीची मागणी केली. घटनेची माहिती तत्काळ जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना देण्यात आली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विलंब न करता एसडीआरएफ पथकाला बचावकार्यासाठी रवाना करण्याचे निर्देश दिले.त्यानुसार सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेदरम्यान मुसळधार पाऊस, अंधार आणि वेगवान प्रवाहाचा सामना करत एसडीआरएफच्या जवानांनी धाडसी बचाव मोहीम राबविली. अथक प्रयत्नांनंतर तिन्ही व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या यशस्वी बचाव मोहिमेमुळे एकाच कुटुंबातील तिघांचे प्राण वाचले.या बचाव मोहिमेत तहसीलदार किशोर बागडे, एसडीआरएफचे पीएसआय मंगलसिंग डाबेराव व त्यांच्या पथकाने, लाहेरी येथील ग्रामस्थांनी तसेच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्थानिक ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आणि जिल्हा प्रशासन, महसूल विभाग व एसडीआरएफ यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे ही जीव वाचविणारी मोहीम यशस्वी ठरली.

RelatedPosts

केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

Previous Post

सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त मूल शहरात समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल

Next Post

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

govind chakravarti

govind chakravarti

Next Post
सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त मूल शहरात समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

August 6, 2026
राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

August 6, 2026
राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

August 6, 2026
दक्षिण गडचिरोलीत अतिवृष्टीचा तडाखा! शेकडो गावांचा संपर्क तुटला; आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ठप्प

दक्षिण गडचिरोलीत अतिवृष्टीचा तडाखा! शेकडो गावांचा संपर्क तुटला; आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ठप्प

August 4, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1