• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

सिरोंचा येथे पुण्यस्नान करण्यासाठी विविध राज्यांतील भाविकांची पसंती

दुसऱ्या दिवशी जवळपास पंधरा हजार भाविकांची हजेरी

Ashish Ghume by Ashish Ghume
April 14, 2022
in महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
सिरोंचा येथे पुण्यस्नान करण्यासाठी विविध राज्यांतील भाविकांची पसंती
Spread the Information

गडचिरोली: जिल्हयातील सिरोंचा येथील नदी घाटावर प्रशासनाने प्राणहिता पुष्कर स्नानासाठी चांगल्या सुविधांची निर्मिती केली आहे. विविध राज्यांमधून दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी दिसून आली. यामध्ये कर्नाटक, आन्ध्र प्रदेश, तेलंगणासह छत्तीसगड येथील भाविकांच्या गाड्या वाहन स्थळावर उभ्या असल्याचे दिसून आले. महाराष्ट्रातील भाविकांसह शेजारी राज्यातील भाविकांनी सिरोंचा येथील मुख्य घाटावर गर्दी केली होती. त्यानंतर प्रशासनाने बऱ्याच भाविकांना नगरम घाटावर जाण्याच्या सूचनाही दिल्या. दुपार नंतर दोन्ही घाटांवर प्रचंड गर्दी असल्याचे दिसून आले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंधरा हजार भाविक आल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला. पहिल्या दिवशी रात्री सात साडेसात पर्यंत आरती होईपर्यंत आंघोळी सुरू होत्या. त्यानूसार दुसऱ्या दिवशीच्या आकड्यांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

दुसऱ्या दिवसापर्यंत प्रशासनाकडून आवश्यक सर्व उपाययोजना पुर्ण करण्यात आल्या आहेत. नगरम येथे पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी कमी असली तरी दुसऱ्या दिवशी मात्र भाविकांना त्याठिकाणी चांगल्या व्यवस्था असल्याचे निदर्शनास आल्याने आज गर्दी वाढल्याचे चित्र होते. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आराम करण्यासाठी सावली, आंघोळीसाठी नदी घाटाबाहेरील व्यवस्था तसेच पूजा अर्चा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था यामूळे भाविकांमध्ये सिरोंचा तसेच नगरम घाटाची निवड केली जात आहे.

महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांचा आकडा वाढला : सन २०१० साली झालेल्या पुष्कर मधे महाराष्ट्रातील विविध जिल्हयातून जेवढे भाविक पवित्र स्नानासाठी आले होते त्यापेक्षा जास्त स्थानिक भाविक आल्याचे व्यावसायिक सांगतात. पुष्कर मोठया प्रमाणात दक्षिणेकडील राज्यांमध्ये साजरा होत असला तरी पवित्र स्नान करण्यासाठी राज्यातील भाविक हजेरी लावत आहेत. गडचिरोलीसह शेजारील चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर तसेच गोंदीया भंडारा येथून भाविक प्राणहितेमध्ये पुण्यस्नानासाठी आले असल्याचे दिसून येत आहे.

पोलीसांकडून पुष्करसाठी बंदोबस्त : गडचिरोली पोलीस दलाकडून जवळपास हजार पोलीस कर्मचारी वाहनतळ, रस्ते, नदी घाट व गर्दीच्या नियंत्रणासाठी तैणात करण्यात आले आहेत. भाविकांना बाधा येवू नये म्हणून वाहनांवर नियंत्रण ठेवणे, आलेल्या वाहनांना उचित स्थळी उभे राहण्यास मदत करणे, गर्दी होवू न देणे, नदी पात्रात इतरत्र असुरक्षित स्थळी आंघोळीसाठी जाणाऱ्यांवर नियंत्रण ठवणे तसेच इतर आवश्यक सुरक्षा व्यवस्था पाहण्यासाठी उन्हात संपुर्ण दिवस सेवा देत आहेत. तसेच रात्रीही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असल्याचे चित्र सिरोंचा शहरात पाहण्यास मिळत आहे.

एसडीआरएफची टीम सिरोंचामधे दाखल : सिरोंचा येथील नदीघाटावर काही ठिकाणी नदीची खोली जास्त आहे. काही भाविक प्रशासनाच्या सूचनांचे पालन न करता पाण्यात आतपर्यंत जाण्याची घाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामूळे जिल्हा प्रशासनाकडून अनावधानाने दुर्घटना घडू नये म्हणून तात्काळ प्रतिसादासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचा एक चमू मागविण्यात आला आहे. सदर चमू आज नागपूर येथून सिरोंचा येथे दाखल होत आहे. दोन्ही घाटावर ते भाविकांच्या सुरक्षे विषयी मदत करणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थान कक्षाकडून सांगण्यात आले आहे.

धनाजी पाटील, अति.जिल्हाधिकारी अहेरी तथा नोडल अधिकारी पुष्कर
– पालकमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या पुढाकाराने यावेळी पुष्कर बाबत विविध उपाय योजना राबविण्यात आल्या आहेत. अंदाजाप्रमाणे भाविक स्नान करण्यासाठी येत असल्याचे दिसून येत आहे. कालपेक्षा आज भाविकांची संख्या वाढत आहे ही समाधानकारक बाब आहे.

जितेंद्र शिकतोडे, तहसिलदार, सिरोंचा
आम्ही प्रशासनाच्या वतीने पुष्कर दरम्यान सिरोंचा व नगरम येथे मिळून पाच लक्ष भाविक येतील असा अंदाज समोर ठेवून तयारी करीत आहे. पुष्कर साठी जवळपास सर्वच कामे पुर्ण होत आली आहेत. आता भाविकांची गर्दीही वाढू लागली आहे. दुसऱ्याच दिवशी पहाटेपासून गर्दी वाढत सायंकाळी जास्त संख्या दिसून आली. पोलीस, महसूल, जिल्हा परिषद, नगर पंचायत तसेच प्रशासनाचे इतर विभाग मिळून आम्ही यावेळीचा पुष्कर यशस्वीपणे पूर्ण करू.

Previous Post

दोन आदिवासी युवकांची नक्षल्यांनी केली हत्या

Next Post

कृषी महोत्सव कार्यशाळा व प्रदर्शनीचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
कृषी महोत्सव कार्यशाळा व प्रदर्शनीचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

कृषी महोत्सव कार्यशाळा व प्रदर्शनीचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1