भामरागड:- भामरागड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची स्थापना झाल्यापासून येथे कायमस्वरूपी एसडीपीओ कार्यरत असतात. मात्र या अतिदुर्गम भागात भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकारी फार क्वचितच मिळतात.आता या ठिकाणी आयपीएस अधिकारी म्हणून सागर भामरे रुजू झाले आहेत.
मुळचे नाशिक जिल्ह्याचे रहिवासी असलेले सागर भामरे हे २०२३-२४ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी आपला परिविक्षाधीन काळ अमरावती जिल्ह्यात पूर्ण केला.त्यानंतर नियुक्तीच्या वेळी त्यांनी स्वेच्छेने गडचिरोली जिल्ह्याची मागणी केली होती.यापूर्वी येथे कार्यरत असलेले एसडीपीओ अमर मोहिते यांची पुसद येथे बदली झाल्याने त्यांना ४ जुलै २०२६ रोजी कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यानंतरपासून भामरागडचा अतिरिक्त प्रभार जिमलगट्टाचे एसडीपीओ राहुल मडावी यांच्याकडे होता.११ सप्टेंबर २०२६ रोजी सागर भामरे यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. एक तरुण, शिक्षित आणि सनदी अधिकारी मिळाल्याने भामरागड तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.













