विसापूर :- केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण भारतात पोलिओ राबविण्यात आले.या मध्ये विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून अठरा बूथ लावण्यात आले होते त्यामध्ये 721 लाभार्थी अपेक्षित होते परंतु अधिक झाले आहे एकूण लाभार्थी 773 झाले.या मध्ये प्रा.आ. केंद्र. विसापूर, विसापूर अंगणवाडी क्र.14 विसापूर अंगणवाडी क्र.02 विसापुर अंगणवाडी क्र.01, विसापूर अंगणवाडी क्र.05 , विसापूर अंगणवाडी क्र.07 चुनाभट्टी,जि.प.शाळा नांदगाव, उपकेंद्र नांदगाव डिस्पेन्सरी डब्ल्यू. सि. एल. नांदगाव, अंगणवाडी चारवट, अंगणवाडी हडसती , अंगणवाडी भीमनगर, उपकेंद्र शिवनी अंगणवाडी हिंगनाला, नवीन सैनिक स्कूल भिवकुंड , बॉटनिकल गार्डन (दर्गा रोड) कन्ट्रक्शन साईट , विसापूर या ठिकाणी बुथ लावण्यात आले होते. या लसीकरणाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विनी कांबळे, आरोग्य सहाय्यक पंजाब चौधरी ,बेबी शेरकी, आरोग्य सेविका प्रियदर्शनी निरंजने, रेणुका इटणकर, परिचारिका संगीता रत्नपारखी, कांता जूनघरे, रंजना खेडेकर, यांनी परिश्रम घेतले. तसेच गावातील आशा व अंगणवाडी सेविका यांनी पण परिश्रम घेतले.













